ठाणे: हरिश्चंद्रगडावर ट्रेकिंगसाठी गेलेले 20 ट्रेकर्स रस्ता चुकल्याने रविवारी तिथेच अडकून पडले. त्या सर्व ट्रेकर्सना बाहेर काढण्यासाठी NDRF ची मदत घेण्यात येतेय. मात्र सर्व ट्रेकर्स सुखरूप असल्याची माहिती प्रशासनाने दिलीय. अंधार झाल्याने या ट्रेकर्सना वाट सापडत नसल्यामुळे ते सर्व अटकले आहेत.
कल्याणचे डॉ. हितेश अडवानी हे 20 जणांसोबत हरिश्चंद्रगड येथे ट्रेकिंग साठी गेले होते. तेथून परतत असताना पुढे दीड किलोमीटर कोकणकडा येथे 1000 फूट खाली हे सर्व ट्रेकर अडकले आहेत. या ट्रेकर्सना एनडीआरएफच्या मदतीने बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू असून जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी अधिकाऱ्यांना स्थानिक अधिकाऱ्यांना मदत करण्याचे निर्देश दिले आहेत.
डॉ. अडवाणी यांच्यासोबत अधिकाऱ्यांचा संपर्क झाला असून त्यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्यासोबत 5 महिला व 17 पुरुष आहेत.कोकणकड्यापासून खाली 800 फूट ते आहेत. अंधार असल्याने त्यांना मार्ग सापडत नाही. त्यामुळे बचाव पथकाला त्यांचे नेमके लोकेशन शोधण्यास अडचण जात आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी ठाणे ग्रामीण पोलीस तसेच जुन्नर पोलीस यांना देखील या घटनेविषयी कळविले असून तहसीलदार अमित सानप या मोहिमेवर लक्ष ठेवून आहेत.
अंधार पडल्याने अडकलेल्या सर्व ट्रेकर्सना अंधारातच रात्र काढावी लागणार आहे. याठिकाणी त्यांना प्रामुख्याने थंडीचा सामना करावा लागणार आहे. त्यांच्याकडे पुरेशी पांघरुणे नाहीत असे अडवाणी यांनी माहिती देतांना सांगितले आहे. पण रात्र झाल्याने बचाव पथकाला मदत कार्य करता येत नाही. सर्व ट्रेकर्सच्या कुटूंबियांनाही प्रशासनानं माहिती दिली आहे
Post A Comment:
0 comments so far,add yours