मुंबई: विद्यापीठे आणि महाविद्यालयीन शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या भरतीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. महाराष्ट्र शासनाच्यावतीने शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची भरती करणार असून, या जागा भरण्यासाठी महाविद्यालयांना अनुमती दिली जाणार असून, तासिका तत्वावर काम करणाऱ्या अध्यापकांच्या मानधनातही वाढ करण्यात आली असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी शुक्रवारी दिली.
राज्यातील विद्यापीठे आणि वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये अनेक वर्षांपासून पदे रिक्त होती, त्यासंदर्भात सर्वदूर चर्चाही सुरु होती. यामुळे होणारे विद्यार्थ्यांचे नुकसान लक्षात घेता, केवळ तासिका तत्वावर अध्यापक भरती न करता आता थेट अध्यापक भरती केली जाणार आहे. त्यानुसार अध्यापकांच्या 3580 जागा, शारिरीक शिक्षण संचालनालयातील 139 जागा, ग्रंथपालांच्या 163 जागा आणि प्रयोगशाळा सहाय्यकांच्या 856 जागा अशी एकूण 4738 पदे येत्या काळात भरण्यात येणार असल्याचे तावडे यांनी सांगितले.
तसेच, तासिका तत्वावर काम करणाऱ्या बहुतांश अध्यापकांचे मानधन दुप्पट करण्यात आले असून, त्यात घसघशीत वाढ करण्यात आली असल्याचे ते म्हणाले. राज्यातील विद्यापीठे आणि महाविद्यालयांतील ही पदभरती उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या प्रचलित धोरणानुसार केली जाणार असल्याचे तावडे यांनी स्पष्ट केले
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours