मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं दिवाळी स्पेशल सिरीजमधलं पाचवं व्यंगचित्र आज सोशल मीडियावर शेअर केलं. या व्यंगचित्रात त्यांनी गेल्या काही वर्षांत केलेल्या आश्वासनांच्या पू्र्तीवरून सरकारची मार्मिक थट्टा केली आहे. व्यंगचित्राची ही मालिका केंद्र आणि राज्य सरकारवर भाष्य करणारी असून राज ठाकरे सरकारला टोेले लगावत आहेत.
धनत्रोयदशीच्या दिवशी पहिलं व्यंगचित्र प्रसिद्ध करण्यात आलं होतं. ज्यात भारत देश ICU मध्ये असल्याचं धन्वंतरी जनतेला सांगत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पहिल्याच व्यंगचित्रातून सरकारला निशाणा साधत देशावर अत्याचार झाल्याचं म्हटलं होतं.
Post A Comment:
0 comments so far,add yours