रिपोर्टर- परदेशी
तालुक्यातील मासळ येथे दि. भं. डिस्ट्रिक्ट सेन्ट्रल को आॅफ. बँक लि. भंडारा च्या वतीने एटीएम चे उद्घाटन व शेतकरी जनजागृती मेळावा आयोजित कार्यक्रमा प्रसंगी मंचावरून खासदार प्रफुल्ल पटेल म्हणाले की, भंडारा व गोंदिया जिल्हा हि माझी जन्मभूमी आणि कर्म भुमी असुन येथील शेतकरी शेतमजूर  हे माझे भाऊ-बहिण आहेत त्यामुळे येथील समस्या शासन दरबारी मांडुन त्या पुर्ण करुन घेण्यासाठी मी सतत प्रयत्नशील आहे व राहील, सद्ध्या च्या सरकारने माझ्या बहुजन समाजातील मिळणाऱ्या शिष्यवृत्ती बंद केले. मी अनेकदा या सरकारला याविषयी माहिती दिली व सुरु करण्याची मागणी पण केली परंतु सध्याची सरकार ही गोरगरिबांची सरकार नसुन ही मोठे उद्योगपती व व्यापाऱ्यांची सरकार आहे असेही ते पुढे म्हणाले.                                  आजच्या कार्यक्रम प्रसंगी मा. आमदार सेवक वाघाये यांनी सरकारला जोरदार धारेवर धरताना म्हणाले की, या सरकारने माझ्या ओबिसी समाज आणि बहुजन समाजाचे पार वाटोळे केले आहे. या सरकारने घोषणा केली की, दरवर्षी 2कोटि नोकर्‍या उपलब्ध करुन देणार परंतु प्रत्यक्षात मात्र यांची पाटि कोरीच राहीली आहे. मी स्वतः ओबिसी समाजाचा राष्ट्रीय कार्याध्यक्ष असुन ओबिसी समाज व बहुजन समाजाच्या लढा लढत राहण्याची ग्वाही त्यांनी दिली.                             माजी राज्यमंत्री बंडुभाऊ सावरबांधे आपल्या अध्यक्षीय भाषणातुन त्यांनी शेतकर्‍यांच्या समस्यांचा पाढा वाचताना म्हणाले की आज शेतकर्‍यांची परिस्थिती खुप गंभीर असुन शेतकर्यांना सरकारने मदत करण्याची गरज आहे. आज आम्ही या ठिकाणी एटिम चे उद्घाटन करण्या साठी साठी एकञीत आलो असलो तरी या परिसरात मोठय़ा प्रमाणात शेतकरी आहेत आणि या परिसरातील शेतकरी हा कधि ओला तर कधि सुक्या दु:सकाळने पार खचला असुन ज्याच्या खिशातच पैसे नसतील तर एटिएम मधुन पैसे कुठून काढणार असेही ते बोलतानी म्हणाले. पुढे ते म्हणाले की, मासळ हे गांव जवळपास 30 गावांची बाजारपेठ असुन या ठिकाणी एटिएम उपलब्धी करुन दिल्याबद्दल सुनिल फुंडे कौतुक केले.                     या कार्यक्रमाला व्यासपीठावर मा. राज्यमंत्री विलास श्रुगारपवार, सुनिल फुंडे,जिल्हा अध्यक्ष प्रेमसागर गणविर, जि. प. अध्यक्ष रमेशजी डोंगरे, इंजिन. सुरेश ब्राम्हणकर, मनोहर महावाडे, शुध्दमता नंदागवली, सरपंचा सविता लेदे, मनोहर राऊत, प्रदीप बुराडे, सत्यवान हुकरे, सदाशिव वलथरे व मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन निषाद लांजेवार आणि प्रास्ताविक सुनिल फुंडे तर आभार उदय भैय्या यांनी केले.                              
       कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी बालु चुन्ने सरपंच उत्तम भागडकर, रतिराम मेंढे, छगण गोंडाणे, देवा राऊत, सुभाष खिलवानी, व अनेक कार्यकर्य्तांनी परिश्रम घेतले.



Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours