● डॉ. नितीन वानखेडे यांची माहिती●
प्रकाश हातेल
चिचाळ (अड्याळ) -
जिल्ह्यात खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेल्या क्षयरोग रुग्णांची माहिती न देणार्या डॉक्टरांना दोन वर्षांची शिक्षा होऊ शकते, अशी माहिती जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. नितीन वानखेडे यांनी दिली.
'प्रत्येक क्षयरोग रुग्णापर्यंत पोहचूयात मिळून सगळे, एकत्र निदान उपचार आणि काळजी हेच सर्व रुग्णांना बरे करण्याचे सूत्र' हे जागतिक आरोग्य संघटनेचे वाक्य आहे. शास्त्रज्ञ डॉ. रॉबर्ट कॉक यांनी २४ मार्च १८८२ रोजी क्षयरोगाच्या जंतूचा शोध लावला. क्षयरोग हा मायक्रोबॅक्टे ट्युबर क्युलोसिस नावाच्या जंतुमुळे होणारा मुख्यत: फुसफुसावर परिणाम करणारा संसर्गजन्य रोग भारतात दर दीड मिनीटाला एक जण क्षयरोगामुळे मृत्यूमुखी पडतो. यावरून या रोगाचे भयंकर स्वरूप लक्षात येतो. निदान, उपचार व काळजी घेतल्यास हा रोगही हमखास बरा होतो, असे डॉ. नितीन वानखेडे यांनी सांगितले.
शासकीय आरोग्य विभाग यंत्रणेकडे क्षयरुग्णाची माहिती अल्पश: प्रमाणात उपलब्ध होत आहे. परंतु, यापेक्षाही अधिक क्षयरुग्ण खासगी वैद्यकीय चिकीत्सकांकडे तपासणी करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. खासगी वैद्यकीय चिकित्सक नोंदणीकृत प्रयोगशाळा चालक व खासगी औषधी विक्रेते यांनी नियमित आरोग्य विभाग यंत्रणेला माहिती देणे बंधनकारक आहे. तर माहिती न देणार्या खासगी वैद्यकीय चिकित्सक, नोंदणीकृत प्रयोगशाळा चालक औषधी विक्रे ते यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम २६९ अन्वये शिक्षा किंवा दंड करण्याचे निर्देश आहेत. कलम २७0 अन्वये २ वर्षांची शिक्षा किंवा दंडात्मक कारवाई करण्याची तरतूद आहे.
तालुका आरोग्य अधिकारी, जिल्हा क्षयरोग अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडे क्षयरुग्णांची माहिती सोबतच क्षयरुग्णांना देण्यात आलेल्या उपचार पद्धती, रुग्णांची प्रगती, थुंकी नमुने, तपासणी याबाबत सुद्धा माहिती द्यावी. जिल्हास्तरावर अत्याधुनिक सिबीनॅट मशिनची थुंकी नमुने मोफत तपासणी करण्याकरीता सेवा जिल्हा क्षयरोग केंद्र भंडारा
येथे उपलब्ध करण्यात आलेली आहे.
क्षयरुग्णांना आर्थिक मदत
क्षयरुग्णांना शासन स्तरावरून विनामूल्य औषधोपचार तपासण्या, आरोग्य शिक्षण तसेच पोषण आहाराकरीता दरमहा ५०० रुपये देण्यात येत आहे.खासगी डॉक्टरांनी क्षयरोगाचा निदान केल्याबाबदची माहिती सरकारी यंत्रनेला तसेच खासगी डॉक्टरांनी क्षयरुग्ण नोंदनी केल्याबाबद ५०० रुपये प्रोत्साहनपर अनुदान तर क्षयरुग्णांचा औषधोपचार पूर्ण झाल्यानंतर रुग्ण बरा झाल्याचे कळविल्यास ५०० रु.असे एकूण १००० रुपये शासन स्तरावरुन क्षयरुग्णनिहाय देण्यात येत आहे.
Post A Comment:
0 comments so far,add yours