कोल्हापूर: स्टीलच्या ग्लास खाली सुतळी बॉम्ब फोडणे एका तरूणाच्या जीवावर बेतलं. इचलकरंजीतल्या गणेशनगर मधील ही घटना. फटाके फोडत असताना राजू भागवत या तरूणाने चक्क सुतळी बॉम्ब एका स्टीलच्या ग्लासखाठी ठेवला आणि क्षणार्धात तो फुटला आणि तो गंभीर जखमी झाला. जास्त रक्तस्त्राव झाल्याने उपचार सुरू असताना त्याचा शनिवारी दुर्देवी मृत्यू झाला.

फटाके फोडण्याचा हा जीवघेणा फंडा कुणाच्या जीवावर बेतू शकतो हे वाचून तुम्हाला धक्काच बसेल. फटाके फोडण्याचा अनोखा फंडा गणेशनगरातल्या राजू भागवत या युवकाचा दुर्देवी मृत्यू झाला. राजूने स्टीलच्या ग्लासखाली सुतळी बॉम्ब ठेवला. वात पेटवली आणि तो क्षणार्धात फुटला. सुतळी बॉम्ब फुटताच स्टीलच्या ग्लासचे तुकडे उडले उडाले आणि ते राजूच्या मांडीत घुसले. त्यात त्याचा मोठया प्रमाणात रक्तस्त्राव झाला. तात्काळ त्याला 'आयजीएम'मध्ये दाखल करण्यात आलं. मात्र, उपचार सुरू असताना राजू भागवतचा शनिवारी सकाळी दुर्देवी मृत्यू झाला.

फटाके फोडत असताना काळजी घेण्याबाबत वारंवार मोठ्यांकडून बजावलं जातं. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केलं जातं. यातलाच हा प्रकार म्हणावा लागेल. ग्लासखाली सुतळी बॉम्ब ठेवल्याने आपल्याला किंवा जवळ उभ्या असलेल्या कुणालाही ईजा होऊ शकते याची पुसटशी कल्पनाही न केल्याने राजूचा दुर्देवी मृत्यू झाला. घडल्या प्रकारामुळे भागवत कु़टुंबाच्या आनंदावर विरजण पडलंय. त्यात राजूच्या अचानक जाण्यामुळे गणेश नगरात शोककळा पसरली आहे. या घटनेची नोंद पोलीसांनी केली असून, हा अपघात नेमका कसाकाय घडला याची शाहनिशा आता पोलीसांकरवी केली जातेय.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours