मुंबई : कडक उन्हामुळे बाष्पीभवनाचा वेग वाढला असून, सध्याच्या घडीला राज्यातील 3 हजार 266 मोठ्या, मध्यम आणि लघू प्रकल्पांत फक्‍त 57 टक्‍केच पाणीसाठा शिल्लक असल्याची माहिती माहिती सुत्रांनी न्यूज18 लोकमतला दिलीय. गेल्यावर्षीच्या तुलनेत 18 टक्‍क्‍यांची घट झाली असून, उन्हाळ्यापूर्वीच अनेक बंधारे कोरडे पडले असल्याने यंदा राज्यात दुष्काळाची दाहकता तिव्र जाणवणार असल्याचं त्यांनी म्हटलंय.
सद्याच्या घटकेलाच मराठवाडा, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागांत भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून, मागील वर्षीच्या तुलनेत मराठवाडा विभागातील धरणांमधील पाणीसाठा तब्बल 46 टक्‍क्‍यांनी घटला आहे. दुसरीकडे नाशिक विभागातील पाणीसाठ्यात 24 टक्‍क्‍यांनी तर पुणे विभागात 17 टक्‍के, अमरावती विभागात 14 टक्‍के, कोकण विभाग सात टक्‍के, तर नागपूर विभागतील पाणीसाठा नऊ टक्क्यांने कमी झाला आहे.
मान्सूनच्या सुरवातीला पडलेल्या पावसामुळे राज्यातील बहुतांश धरणात 100 टक्‍के पाणीसाठा होता. मात्र, दुष्काळाच्या तीव्रतेमुळे त्यात झपाट्याने घट झाली. त्याचा परिणाम रब्बीच्या पेरणीवर झाला असून राज्यात अद्यापपर्यंत फक्‍त 17 टक्‍केच रब्बीच्या पेरण्या झाल्या आहेत. दुष्काळाची तीव्रता कमी करण्यासाठी प्रत्येक घटकांनी उपलब्ध पाण्याचे नियोजन जनावरांच्या चाऱ्यासाठी व पिण्यासाठी करावे, असे आवाहन सरकारकडून करण्यात आले आहे.
प्रकल्पनिहाय पाणीसाठा
मोठे प्रकल्प - 140
पाणीसाठा - 62.58 टक्‍के (मागील वर्षी 80.38 टक्‍के होता )
मध्यम प्रकल्प - 258
पाणीसाठा - 50.23 टक्‍के (मागील वर्षी 70.07 टक्‍के होता)
लघू प्रकल्प - 37.71 टक्‍के (मागील वर्षी 55.26 टक्‍के होता)
विभागनिहाय सध्याचा पाणीसाठा
अमरावती - 54.90 टक्‍के (मागील वर्षी 41 टक्‍के होता)
कोकण - 83.51 टक्‍के (मागील वर्षी 90.81 टक्‍के होता)
नागपूर - 31.65 टक्‍के (मागील वर्षी 40.83 टक्‍के होता)
नाशिक - 59.93 टक्‍के (मागील वर्षी 84 टक्‍के होता)
पुणे - 74.63 टक्‍के (मागील वर्षी 91.48 टक्‍के होता)
मराठवाडा - 23.14 टक्‍के (मागील वर्षी 69.25 टक्‍के होता)
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours