भंडारा,दि. 19 :- उपप्रादेशिक परिवहन कार्यालय व सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने रविवारी शहरातून काढण्यात आलेल्या " महावॉकेथॉन "  रॅलीने शहरात रस्ते सुरक्षा जनजागृती करण्यात आली.  रस्ते सुरक्षेबाबत जनजागृतीच्या उद्देशाने काढण्यात आलेल्या या " महावॉकेथॉन"  रॅलीमध्ये उपप्रादेशिक परिवहन कार्यालय भंडारा व  सार्वजनिक बांधकाम मंडळातील अनेक अधिकारी-कर्मचाऱ्यांनी  सहभागी होऊन महावॉकेथॉन रॅली यशस्वी केली.
    रस्ते सुरक्षा जनजागृतीच्या मुख्य उद्देशाने  उपप्रादेशिक परिवहन कार्यलय, सार्वजनिक बांधकाम विभाग,  जिल्हयातील सेवाभावी संस्था यांच्या सहकार्याने रविवारी सकाळी 8 वाजता बांधकाम भवन येथून या  महावॉकेथॉन रॅलीचा शुभारंभ जिल्हाधिकारी शांतनू गोयल यांच्या हस्ते झेंडा दाखवून करण्यात आला, यावेळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र वर्मा, कार्यकारी अभियंत डी. एन. नंदनवार,  सहाय्यक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रशांत झाडे, उप कार्यकारी अभियंता श्रीमती वसावे, उपअभियंता धार्मिक व वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
     राज्यात एकाच दिवशी- एकाच वेळी महावॉकेथॉन रॅली काढण्यात आली. भंडारा मध्ये ही महावॉकेथॉन रॅली आरटीओ आफिस, त्रिमुर्ती चौक, मुस्लीम लॉयब्ररी, कुकडे नर्सिग होम, पांडे महाल, गांधी चौक, पोस्ट ऑफिस, बसस्थानक ते विश्रामगृह या मार्गावरुन काढण्यात आली.
      रॅलीमध्ये वाहतूक नियम, रस्ते सुरक्षा, जबाबदारीपूर्वक वाहन चालवणे, वाहनाचे भोंगे न वाजविणे याबाबत माहितीचे फलक  अधिकारी कर्मचाऱ्यांनी हातात घेऊन रस्ते सुरक्षेबाबत घोषणाही दिल्या. या रॅलीत बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील सर्व अधिकारी, कर्मचारी, कंत्राटदार तसेच सेवाभावी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांचा  सहभाग होता. 
   महावॉकेथॉन रॅलीमध्ये  उपप्रादेशिक कार्यालय व बांधकाम विभागातील अनेक अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले होते.


Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours