मुंबई: राफेल करारावरून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यानंतर आता शिवसेनाही आक्रमक झाली आहे. ‘राफेल हा बोफोर्स घोटाळ्याचाही बाप आहे,’ असं म्हणत शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'तून मोदी सरकारवर भ्रष्टाचाराचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
‘महाराष्ट्रात ज्याप्रमाणे जलसंधारण घोटाळा झाला नाही, त्याच धर्तीवर संरक्षण खात्यात राफेल घोटाळा झाला नाही, हे आता मान्य करायला हवं, असा उपरोधिक टोलाही सामनाच्या अग्रलेखातून लगावण्यात आला आहे.
काय आहे सामनाच्या अग्रलेखात?
राफेल व्यवहारासंदर्भात जे बंद पाकीट सरकारमार्फत सर्वोच्च न्यायालयासमोर सादर केले गेले त्यात सत्य आहे की ते पाकीट कोरेच आहे ते कुणाला कसे कळेल? राफेलचा सौदा हा बोफोर्सचा बाप आहे. पण बापाने गुन्हा केल्याचा एकही पुरावा हाती नाही. बोफोर्स-राफेल व्यवहारात जनतेच्याच पैशाची लूट झाली. पाच रुपयांस मिळणारी वस्तू सरकारी पैशाने दोन हजार रुपयांना कोणी खरेदी करीत असेल तर त्यास काय म्हणावे? पण असे काही घडलेच नाही असा दावा सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमांतून करण्यात आला आहे. म्हणजे न्यायालयाच्या चपलेने राहुल गांधींनी केलेल्या राफेल आरोपाचा विंचू मारण्याचा प्रयत्न झाला आहे. राफेल प्रकरणाचे पुढे काय होणार हा प्रश्न अधांतरितच आहे.
जलसंधारण घोटाळ्याची फाईल मंत्रालयातील कोणत्या टेबलावर आहे ते कळायला मार्ग नाही. आम्ही जलसंधारण घोटाळा व त्याचा तपास एक चिंतनाचा विषय म्हणून पाहत आहोत व राष्ट्रीय स्तरावरील राफेल घोटाळा हा ‘डॉक्टरेट’ अभ्यासाचा विषय म्हणून पाहत आहोत! घोटाळे झालेत, पण पुरावे नाहीत. देशातील सीबीआयचे दोन प्रमुख संचालक एकमेकांविरुद्ध भ्रष्टाचार, खंडणीखोरीचे आरोप करतात. सरकार दोघांवरही कारवाई करते. यातील एक अधिकारी म्हणे राफेल व्यवहाराची चौकशी करण्याच्या तयारीत होते. म्हणून त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवले, पण घोटाळा झालाच नाही व सर्वोच्च न्यायालयासमोर सचोटीचा लिफाफा सादर केल्यावर घाबरायचे कारण काय? श्रीमान अनिल अंबानी यांच्या कोणताही अनुभव नसलेल्या कंपनीला राफेलचे कंत्राट मिळाले ते काय फक्त गुणवत्तेच्या जोरावर? विजय मल्ल्या, नीरव मोदी, मेहुल चोक्सी व इतर अनेक बड्या उद्योगपतींनी बँकांचे कर्ज बुडवले. हा मोठा घोटाळाच आहे. त्याप्रमाणे बोफोर्स-राफेल व्यवहारात जनतेच्याच पैशाची लूट झाली. पाच रुपयांस मिळणारी वस्तू सरकारी पैशाने दोन हजार रुपयांना कोणी खरेदी करीत असेल तर त्यास काय म्हणावे? पण असे काही घडलेच नाही असा दावा सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमांतून करण्यात आला आहे. म्हणजे न्यायालयाच्या चपलेने राहुल गांधींनी केलेल्या राफेल आरोपाचा विंचू मारण्याचा प्रयत्न झाला आहे. राफेल प्रकरणाचे पुढे काय होणार हा प्रश्न अधांतरितच आहे
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours