मुंबई : गेले 12 दिवस सुरू असलेला ओला-उबर चालकांचा संप अखेर संपला आहे. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी या प्रकरणात मध्यस्ती केल्यानंतर अखेर यावर तोडगा काढण्यात आला आहे. या संपावर दिवाकर रावतेंनी मध्यस्थी करून मंत्रालयात एक खास बैठक घेतली.

यात ओला आणि उबरने चालकांना दिवाळी दरम्यान इन्सनटीव्हची स्कीम देण्याक आली आहे. त्यामुळे 15 नोव्हेंबरपर्यंत तरी हा संप संपवण्यात आला आहे. गेले 12 दिवस हा संप सुरू होता पण याची परिवहन मंत्र्यांनी दखल घेतली नसल्याची बातमी दरम्यान, या बैठकीनंतर इंधनाच्या वाढीव दरावर आधारित सुधारित दरांचा प्रस्ताव 15 नोव्हेंबरला आणला जाईल अशी ओला-उबरने हमी दिली आहे. त्यानंतर संप मागे घेण्यात आला आहे.

चालकांचे प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाचे सरचिटणीस सचिन अहिर, परिवहन सेक्रेटरी आशिष कुमार सिंग, परिवहन अतिरिक्त आयुक्त सतीश सहस्त्रबुद्धे  यांच्यासह ही बैठक घेण्यात आली होती.

15 नोव्हेंबरनंतर ओला-उबरकडून प्रस्ताव नीट आला नाही तर संप पुन्हा होऊ शकतो असा इशाराही या बैठकीत देण्यात आला आहे
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours