यवतमाळ, 3 नोव्हेंबर : राळेगाव परिसरात 13 ग्रामस्थांची शिकार करणाऱ्या नरभक्षक ‘टी वन’ वाघिणीला गोळी घालून ठार करण्यात आलं आहे. मध्यरात्रीच्या सुमारास शूटर अजगर अली खान यानं या वाघिणीला गोळ्या घातल्या आहेत.
कक्ष क्रमांक 149 मध्ये शोधपथकातील शिकाऱ्याने वाघिणीला बेशुद्ध करण्याचा प्रयत्न केला. पण यावेळी वाघिणीने आक्रमक होऊन शोधपथकावर चाल केली. त्यामुळे मग या वाघिणीवर बंदुकीतून गोळी झाडण्यात आली. यामध्ये नरभक्षक वाघिणीचा मृत्यू झाला आहे.
या वाघिणीला जेरबंद करा अथवा ठार मारा, असे प्रधान मुख्य वन संरक्षकांचे आदेश 11 सप्टेंबरला सर्वोच्च न्यायालयानेही कायम ठेवले. त्यानंतर राळेगावच्या जंगलात मिशन टी वन कॅप्चरला सुरूवात झाली. आता मोठ्या प्रयत्नानंतर ह्या वाघिणीला संपवण्यात वन विभागाला यश आलं आहे.
दरम्यान, राळेगावमधील या नरभक्षक वाघिणीला पकडण्यासाठी नागपूरच्या महाराज बागेतील वाघिणीच्या मूत्राचाही वापर केला गेला. वाघिणीचा वावर असलेल्या जंगलातील परिसरात हे मूत्र वन विभागाच्या वतीने फवारण्यात आलं. या मूत्राचा उग्र गंधाचा पाठलाग करत वाघीण झुडपातून बाहेर येईल आणि तिला जेरबंद करण्यासाठी मदत होईल, या उद्देशाने हा प्रयोग करण्यात आला होता
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours