कन्हाळगाव येथे विविध कामाचे भूमीपूजन

 भंडारा, दि. 26 :- महाराष्ट्र शासनाचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंती निमित्त निवडक अनुसूचित जाती व बौध्द वस्त्यांचा सर्वांगिण विकास योजनेंतर्गत नुकताच पवनी तालुक्यातील मौजा कन्हाळगाव  येथील विविध विकास कामाचे तसेच मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतीगृह,पवनी करीता नव्याने बांधकाम करण्यात आलेल्या मौजा सिंदपुरी/रुयाळ येथील वसतीगृह इमारतीचे उदघाटन राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य  मंत्री राजकुमार बडोले यांच्या शुभहस्ते करण्यात आले. 
 यावेळी आमदार रामचंद्र अवसरे, पवनी पंचायत समितीचे सभापती धनराज ढेंगरे, जि.प. सदस्या मनोरथा जांभूळे, समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त डॉ. सिध्दार्थ गायकवाड, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण आशा कवाडे, उपविभागीय अभियंता श्रीमती सावरकर, रुयाळचे सरपंच माधुरी पचारे, उपसरपंच भोगे, धारगावे, कन्हाळगावचे सरपंच माया बावनकुळे, उपसरपंच धरमदास मेश्राम, एकनाथ नागपूरकर, माजी जि. प. अध्यक्षा किसनाबाई भानारकर, पं.स. सदस्य मनोहर आकरे, प्रकाश गेडाम, परसराम डडमल व इतर मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते भूमीपूजन व उदघाटन करण्यात आले. 
 मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतीगृह पवनी ( सिंदपूरी/रुयाळ ) येथील वसतीगृह उदघाटन प्रसंगी सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी सामाजिक न्याय विभागाद्वारे विविध लोकोपयोगी योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे काम केल्या जाते. त्याचा लाभ सर्वसामान्य जनतेने घ्यावा. त्याचाच एक भाग सिंदपूरी मध्ये शासकीय सर्व सोयीने युक्त अशी वास्तु निर्माण करण्यात आली, असे त्यांनी सांगितले. 
 आमदार रामचंद्र अवसरे यांनी या क्षेत्रातील विकासाकरीता कटिबध्द असल्याचे मनोगत व्यकत केले. तसेच डॉ.सिध्दार्थ गायकवाड यांनी आपल्या प्रास्ताविकात विभागाद्वारे विविध योजना राबविल्या जातात, त्याची माहिती विषद केली.  कार्यक्रमाचे संचलन बार्टीचे प्रक्लप अधिकारी बादल यांनी केले तर  उपस्थितांचे आभार सहाय्यक आयुक्त समाज कल्याण आशा कवाडे यांनी मानले. 
 सदर कार्यक्रमांप्रसंगी सिनेअभिनेता व प्रबोधनकार अनिरुध्द वनकर यांच्या “मी वादळ वारा ” या लोकगिताचे सादरीकरण करण्यात आले. कार्यक्रमास बहुसंख्येने ग्रामवासी व परिसरातील नागरिक उपस्थित होते. या कार्यक्रमास समाजकल्याण व सार्वजनिक बांधकाम विभागाचे सर्व कर्मचारी, बार्टीचे समता दूत, वसतीगहाचे गृहपाल व कर्मचारी, बीव्हीजी कंपनीचे कर्मचारी तसेच वसतीगृहाचे विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभले.



Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours