सातारा, 1 नोव्हेंबर : ‘मंडल आयोगामुळे सगळी वाट लागली असून आरक्षण आर्थिक निकषावरच दिलं गेलं पाहिजे,’ असं म्हणत राष्ट्रवादीचे नेते आणि खासदार उदयनराजे भोसले यांनी मंडल आयोगावर टीका केली आहे. धनगर समाजाच्या नेत्यांबरोबर झालेल्या बैठकीत बोलताना उदयनराजेंनी हे वक्तव्य केलं आहे.
उदयनराजे यांनी या बैठकीत धनगर आरक्षणावरही आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, ‘धनगर समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. परंतु दिलं तर सगळ्यांना द्या अन्यथा कोणालाच आरक्षण देऊ नका.’
दरम्यान, महाराष्ट्रात आरक्षणाचा प्रश्न गेल्या काही काळापासून मोठ्या प्रमाणात वेग पकडत आहे. मराठा आणि धनगर आरक्षणासाठी मोठ-मोठे मोर्चेही निघाले आहेत. या पार्श्वभूमीवर उदयनराजे यांनी थेट आर्थिक निकषांवर आधारित आरक्षणाची मागणी करत नव्या वादाला तोंड फोडलं आहे.
‘पापं इथंच फेडावी लागतात...’
उदयनराजे भोसले यांनी या बैठकीत केलेल्या आणखी एका वक्तव्याची जोरदार चर्चा होता आहे. ‘या जन्मात केलेली पापं इथंच फेडावी लागतात आणि म्हणूनच कॅन्सर, डायलेसीस सारख्या आजारांना सामोरं जावं लागतं’ असं खा. उदयनराजे म्हणाले आहेत. उदयनराजेंनी या वक्तव्यातून नक्की कुणाला टोला लगावला, याबाबत वेगवेगळे अंदाज बांधले जात आहेत.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours