राजीव गांधी चौक ते जिप. चौक येथील अर्धवट खोदकाम केलेल्या रस्त्याचे बांधकाम त्वरीत चालु  करण्यात यावे अशी मागणी भंडारा शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युवक आघाडीने केली आहे. या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी भंडारा मार्पâत पंतप्रधान भारत सरकार तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र सरकार यांना देण्यात आले. एच.जी. इन्प्रâा वंâपनीद्वारे चालु असलेल्या ५४७ राज्य महामार्ग सावनेर खात, भंडारा राजीव गांधी चौक ते जिप. चौक हा मुख्य रस्ता नेशनल हायवे अ‍ॅथारिटी (एनएचएआय) अंतर्गत चालु झाला आहे.  परंतु नगरपालिका विभागाच्या वादविवादामुळे त्याचे बांधकाम थांबले असून  ८पान २ वर
काम त्वरीत सुरु न केल्यास ..
आणि त्या रस्त्यावर शाळा, शासकीय कार्यालय व खाजगी दवाखाने तसेच वसाहती असून या रस्त्यावर खूप मोठया प्रमाणात  वाहतुक सुरु असते.  सदर रस्त्याचे अपूरे खोदकाम झाल्यामुळे एकेरी वाहतुक सुरु आहे.  त्यामुळे सदर रस्त्यावर जाणे व येणे कठिण झालेले आहे.  त्यामुळे अपघाताची संख्या वाढलेली आहे.  भविष्यात कोणाचा जीव गेल्यास नगरपालिका आणि प्रशासन जबाबदार राहील.
वेंâद्रामध्ये भारतीय जनता पार्टीची सरकर, राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीची सरकार, नगर परिषदेला भारतीय जनता पार्टीची सरकार आहे.  परंतु, याच्या समन्वय बरोबर नसल्यामुळे सदर रस्त्याचे बांधकाम बंद पडलेले आहे.  त्याच्या वादामुळे याचा त्रास सामान्य जनतेला भोगावा लागत आहे.  सदर रस्त्याचे बांधकाम त्वरीत सुरु करण्यात यावे अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्पेâ तिव्र आंदोलन करण्यात येईल असे भंडारा शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युवक आघाडीचे भंडारा शहर अध्यक्ष सुमित घोगरे यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours