रिपोर्टर अजय मेश्राम
। भंडारा।२२ नोव्हेंबर
राष्ट्रीय महामार्ग ५४७ ला जोडण्यासाठी 'भंडारा-खात-सावनेर' हा महामार्ग बनवण्यात येत आहे. परंतु, हा महामार्ग आता वादाच्या भोवNयात सापडला आहे. नगरपरिषद अध्यक्ष यांनी पत्र लिहून या महामार्गाचे काम थांबविले आहे. रस्ते निर्मितीच्या वेळेस योग्य मोजमाप न करता बांधकाम सुरू केल्याच्या आरोपावरून नागरिक न्यायालयात जाण्याच्या तयारीत आहेत. रस्त्याचा एका बाजूने खोदकाम झाल्याने रस्त्याच्या दुसNया बाजुला दुतफी वाहतूक होत असल्याने या संकरित रस्त्यावर वाहतुकीची कोंडी होत आहे.
 या निर्माणाधीन राष्ट्रीय महामार्गाचा शेवटचा टप्पा भंडारा शहरातील केशवनगर ते जिल्हा परिषद  चौक एवढा आहे. मागील ३ महिन्यांपासून हे कार्य भंडारा शहराच्या सीमेत सुरू आहे. खात रोडवरील काम सुरू असतानाच जिल्हा परिषद चौकापासून दुसरा टप्प्याचे काम सुरू करण्यात आले होते. यासाठी डांबरीकरण असलेल्या या रोडच्या एका बाजूने खोदकामाला सुरुवात झाली. २ दिवस हे खोदकाम सुरू असताना नगरपरिषद भंडाराचे अध्यक्ष सुनील मेंढे यांनी बांधकाम करणारी 'एच. जी. इन्फ्रा इंजीनियरिंग लिमिटेड' आणि उप अभियंता राष्ट्रीय महामार्ग भंडारा यांना पत्र लिहून काम थांबविण्यास सांगितले. त्यांच्या मते हे काम सुरू करण्याअगोदर एच. जी. इन्फ्रा या कंपनीने नगरपरिषदतर्फे ना हरकत प्रमाणपत्र घेतले नाही. तसेच भंडारा शहराकरीता शासनाकडून नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर झाली आहे. त्यामुळे शहरात नवीन पाईपलाईन टाकण्याचे काम लवकरच सुरु होत आहे. तसेच कंपनीने आम्हाला 'डिव्हायडर इलेक्ट्रिक पोल' त्यांची जागा बदलण्याबाबत कळविले आहे. मात्र, यासाठी कंपनी आणि नगरपरिषद यांच्याशीही चर्चा झालीच नाही.   कोणतेही प्रयोजन नसताना कंपनीने रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सुरू केले आहे. त्यामुळे जोपर्यंत या सर्व गोष्टी चर्चेतून आणि नियोजनातून पूर्ण होणार नाहीत तोपर्यंत हे काम थांबविले जाणार असल्याचे मेंढे यांनी सांगितले. मागील ३ महिन्यापासून शहरातील रस्त्याचे काम सुरू असताना अध्यक्षांना एवढ्या उशिरा का जाग आली? हा राष्ट्रीय महामार्ग होणार असल्याचे माहीत असतानाही 'स्ट्रीट लाईट' लागण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले आहेत. हे 'स्ट्रीट लाईट' ज्या ठिकाणी लावण्यात आले आहेत त्याच्या पलीकडे रस्ता रुंदीकरणाचे काम होणार आहे. हे लाईट लावतांना जागेचे मोजमाप करून त्यानुसार का पोल लावले गेले नाही? अध्यक्षांनी सर्वसामान्य लोकांचे पैसे अशा पद्धतीने का उडविले?, असा प्रश्न नागरिक करत आहेत. जिल्हा परिषद चौकापासून सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू करण्याअगोदर रस्त्याच्या मधला केंद्रबिंदू कोणता हे १९९२- ९३ च्या बंदोबस्त नकाशाच्या आधारे ठरविले जात आहे. आतापर्यंत भूमी अभिलेख कार्यालयामार्फत मोजणी करण्यात आली होती. त्यामध्ये कधी ५ फूट आत तर कधी ५ फूट बाहेरपर्यंत लोकांच्या घरावर आणि कंपाऊंडवर वेगवेगळी मार्किंग केलेली दिसत आहे. त्यामुळे नेमकी कोणती मार्किंग योग्य आहे याविषयी लोकांच्या मनात संभ्रम निर्माण झालेला आहे. तसेच भूमिअभिलेख कार्यालयात मागील बंदोबस्ताचा नकाशा १ :४००० या स्केल प्रमाणे आहे. परंतु, १९९२- ९३ चा नकाशा १ :५००० या स्केलप्रमाणे आहे. त्यामुळे मोजणी करणे कठीण जात आहे. रस्ते रुंदीकरणाचे काम सुरू करण्याअगोदर रस्त्याचा केंद्र बिंदू डेप्युटी डायरेक्टर टाउन प्लॅनिंग यांच्या ड्राफ्ट डेव्हलपमेंट प्लॅननुसार ठरवावा. याविषयीचे जिल्हाधिका?्यांना निवेदन नागरिकांनी दिलेले आहे. या मागणीकडे दुर्लक्ष केल्यास नाईलाजास्तव पुढील कारवाईसाठी उच्च न्यायालयाची दारे ठोठवावी लागतील, असे या निवेदनात म्हटले आहे. विशेष म्हणजे शहराच्या मधून राष्ट्रीय महामार्ग का? हा राज्य महामार्ग आहे, रस्त्याच्या दुतर्फा लोकांची घरे आणि दुकाने आहेत. त्यामुळे या रस्त्याचे रुंदीकरण झाले तरी राष्ट्रीय महामार्ग न बनता फक्त राज्य महामार्ग रहाव अशी मागणी नागरिक करीत आहेत. याविषयी कंपनीच्या अधिकाNयांना विचारले असता त्यांनी सांगितले, की सध्या आम्ही पी. डब्ल्यू. डीने बनविलेल्या नालीपर्यंतच रस्ता बांधत आहोत. त्यामुळे कोणाचेही बांधकाम आम्ही तोडणार नाही. मात्र, नालीनंतर जागा नसल्याने फुटपाथसाठी आणि पार्किंगसाठी जागाच उरणार नाही. त्यामुळे भविष्यात मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागेल.

-------------------
शहरातुन महामार्गाचे काम सुरु होऊन  चार दिवस झाले.तब्बल ५०० मिटर खोदकाम  झाल्यावर नगरपरिषदला जाग आली. जि. प.चौकामधुन जेव्हा काम सुरु केला तेव्हाच कामाला थांबावयला हावा होता. परंतु आता खोदकामामुळे या रोडावर अपघाताची भिती निर्माण झाली आह. या रोडावर कुढलाही अपघात झाल्यास नगराध्यक्षावर  गुन्हा नोंदवीण्यात यावा.
              यशवंत सोनकुसरे
जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काग्रेस 

Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours