जिल्हा संपादक शमीम अकबानी
तुमसर (दि. २१ नोव्हेंबर २०१८) : तुमसर- गोंदिया मार्गावर उड्डाणपूलाजवळील गेल्या तीन वर्षांत तुम्ही केव्हाही आले असले तर तुम्हाला बारामाही या रस्त्याचे काम चालू दिसत होते. या रस्त्यावर भले मोठे मोठे खड्डे पडले असून, त्यांची डागडूजीही करण्यात येत नाही. त्यामुळे अर्धा रस्ता उखडण्याच्या स्थितीत आला आहे. त्यामुळे या कामाची चौकशी होऊन नव्याने रस्ता झाला पाहिजे, अशी मागणी शिवसेनेचे पदाधिकारी यांनी केली आहे. तसेच या संपूर्ण प्रकरणाची माहिती भंडारा- गोंदिया जिल्ह्याचे संपर्क प्रमुख श्री निलेश धुमाळ यांना आम्ही फोनद्वारे दिलेली आले आहे, त्यांनी या गंभीर विषयाची माहिती पर्यावरण मंत्री मा. श्री रामदासजी कदम साहेब यांना हिवाळी अधिवेशनात कळविण्यात येईल असे आम्हाला सांगितले.
तुमसर- गोंदिया राज्यमहामार्ग रस्ता अतिशय वर्दळीचा आहे. रात्रीच्या वेळी या रस्त्याने घनदाट अंधाराचे साम्राज्य असते. रस्त्यात चढाव उतार तर आहेतच त्या ठिकाणी खूप फ्लाय अँश राख व मोठे मोठे खड्डे पडले आहेत. 
रस्ता खराब होणे म्हणजे निश्‍चितच निकृष्ठ बांधकाम आणि भ्रष्टाचार असेल यात शंका नाही. त्यामुळे रस्त्यातील खड्डे वाहन चालकांचा दिसत नाही व अपघात घडणे नित्याचे झाले आहे. नव्याने रस्ता बांधवा व फ्लाय अँश राख उचलून उर्वरित रस्ता पूर्ण करावा, अशी मागणी शिवसेना भंडारा जिल्हा कार्यालयीन प्रमुख अमित एच. मेश्राम, वाहतूक सेनेचे जिल्हा अध्यक्ष दिनेश पांडे, उपजिल्हाप्रमुख जगदीश त्रिभुवनकर, तालुका प्रमुख गुड्डू डहरवाल, संजू डहाके, किशन सोनवाणे, शुभंम बावणे शरणम नागदेवे सह शिवसैनिकांनी केली आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours