मुंबई: मुंबईतल्या आरे कॉलनित आत्महत्येची चटका लावणारी घटना समोर आलीय. दोन बहिणींनी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली होती. पोलिसांनी या घटनेची चौकशी केल्यानंतर अतिशय धक्कादायक आणि चटका लावणारं वास्तव समोर आलंय. त्या दोघी चुलत बहिणी असून त्यांनी आत्महत्येपूर्वी सेल्फी काढल्याचं स्पष्ट झालंय.

या दोन बहिणी या उत्तम मैत्रीणीही होत्या आणि त्या एकमेकींशिवाय राहूही शकत नव्हत्या. सेल्फी घेण्याची त्यांना अतिशय आवड होती. पण नेमकी त्यांनी आत्महत्या करून जीवन का संपवलं हे गुढ अजून उकलेलं नाही.

पोलिसांना काही धागेदोरे हाती लागले आहेत.

त्यानुसार या दोनही बहिणीचं एकाच मुलावर प्रेम होतं. दोघींनाही तो आवडत होता आणि दोघींनाही त्याच्याशीच लग्न करायचं होतं. मात्र ते शक्य नसल्यानं त्यांनी हा निर्णय घेतला असू शकतो अशीही शक्यता व्यक्त केली जातेय.

आत्महत्येपूर्वी त्या बहिणी आरे कॉलनितल्या विहिरीजवळ गेल्या.
त्यांनी मिळून सेल्फी घेतला तो एका मित्राला पाठवला आणि त्यांनी आत्महत्या केली. त्यांनी ज्याला सेल्फी पाठवला त्याची ओळख अजुन पटलेली नाही. मुलींचं ज्याच्यावर प्रेम होतं त्यालाच त्यांनी सेल्फी पाठवला की आणखी दुसरं कुणी होतं याबाबत पोलिसांनी अजुन माहिती दिलेली नाही.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours