मुंबई: शहरांच्या नामांतरणाच्या मुद्द्यावरून राजकारण तापलं असतानाच, आता समृद्धी महामार्गाच्या नामकरणावरुन शिवसेना आणि भाजप आमने सामने येण्याची शक्यता बळावली आहे. 

आधी समृद्धी महामार्गाला तीव्र विरोध करणाऱ्या शिवसेनेनं, आता समृद्धी महामार्गाला दिवगंत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं नाव देण्याची मागणी केली आहे. 

शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे आणि आमदारांच्या शिष्टमंडळाने आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि समृद्धी महामार्गाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव द्यावे अशी मागणी निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांकडे केली. 

तर शिवसेनेला शह देण्यासाठी भाजपनेही तयारी केली आहे. समृद्धी महामार्गाला भाजपकडून माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचं नाव देण्यात येणार असल्याची शक्यता राजकीय सूत्रांनी वर्तवली आहे. 

विशेष म्हणजे, शिवसेनेनं आधी समृद्धी महामार्गाला विरोध केला होता. शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावल्या जातील असा आरोप सेनेनं केला होता. त्यानंतर सेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्तेच समृद्धीसाठी शेतकऱ्यांच्या जमिनी घेण्याचे काम सुरू झाले होते. यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन माझी भूमिका स्पष्टं आणि ठाम आहे. जो पर्यंत शेतकऱ्यांच्या मागण्या जो पर्यंत मान्य होत नाही. तोपर्यंत शिवसेना त्यांच्यासोबत आहे. शेतकऱ्यांची सुपीक जमीन समृद्धी महामार्गासाठी वापरली जाता काम नये आणि त्यांच्या जमिनीचा मोबदला योग्य मिळावा या शेतकऱ्यांच्या भूमिका आहे. यासाठीच मी एकनाथ शिंदे यांना तिथे पाठवलं होतं. त्यांच्या उपस्थिती शेतकऱ्यांनी जमिनी व्यवहार पूर्ण केला असा खुलासा केला होता. 

असा आहे समृद्धी महामार्ग

विकासापासून दूर असलेल्या विदर्भ आणि मराठवाड्याला राज्याची राजधानी मुंबईशी अवघ्या सहा तासात जोडण्यासाठी नागपूर- मुंबई समृद्धी महामार्गाची योजना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आखली. हा रस्ता बांधण्यासाठी २८ हजार कोटी रुपये खर्च येणार आहे तर या प्रकल्पासाठी ४० हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. हा संपूर्ण खर्च कर्जाद्वारे उभारला जाणार आहे.

हा रस्ता वापरणाऱ्यांना कारचालकांना तब्बल १४०० रुपये टोल मोजावा लागेल तर बस, ट्रक आणि इतर व्यावसायिक वाहनांना ४२०० रुपये टोल आकारला जाईल. तर या रस्त्यावर एकूण तीन ठिकाणं आपातकाळात विमान उतरण्याची सोय असेल
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours