मुंबई: मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या कुंचल्यातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून ते शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना चांगलेच फटकारे लगावले. आता भाजपनेही जशाच तसे उत्तर देत राज ठाकरे यांची खिल्ली उडवली आहे.
भाजपने आपल्या 'महाराष्ट्र भाजपा' या टि्वटर अकाऊंटवर एक व्यंगचित्र प्रसिद्ध केले आहे. या व्यंगचित्रात राज ठाकरे हे व्यंगचित्र काढण्यात मग्न आहे. तर दुसरीकडे त्यांच्या कार्यकर्ते दाखवण्यात आले आहे. मनसेचे कार्यकर्ते हे राज ठाकरे यांना "साहेब,लोकसभा निवडणूक जवळ आली" अशी आठवण करुन देत आहे. पण राज ठाकरे हे व्यंगचित्र काढण्यातच मग्न आहे. अखेर "साहेब,आपल्याला एकही जागा जिंकता आली नाही" असं कार्यकर्ते म्हणताना दाखवण्यात आले आहे. विशेष, म्हणजे राज ठाकरे स्वत:चं व्यंगचित्र रेखाटत आहे.
भाजपने राज ठाकरे यांना व्यंगचित्रातून जशाच तसे उत्तर दिले खरे पण त्या व्यंगचित्रातही एक चूक झाली असं दिसतंय. या व्यंगचित्रामध्ये मनसेचे कार्यकर्ते हे भगव्या रंगाचा शेला घातलेले दाखवण्यात आले आहे. त्यामुळे ते मनसेचे कार्यकर्ते की शिवसेनेचे याचा मात्र गोंधळ झाला आहे.

Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours