(लाखनी मधे मिरवणुक रैली काढुन केली जयंती साजरी)
 लाखनी प्रतिनीधी सलीम मिर्जा
लाखनी---ईद-ए-मिलाद म्हणजे ' अल्लाह' चे प्रेषित हजरत महंमद पैंगबर यांचा जन्मदिवस .
-----संपुर्ण जगभर 'ईद-ए-मिलादुन्नबी'हा सण इस्लामी वर्ष हिजरी रब्बीअव्वल महिन्याच्या बारा तारखेला माेठ्या उत्साहात साजरा केला जाताे.आपल्या जिवनकाळात हजरत माेहमंद यांनी समस्त मानवजातीला उदारता,समता,विश्वबंधुत्व,
सामाजिक न्यायाची शिकवण दिली.त्यांची शिकवण केवळ काही विशीष्ट जातीधर्मापुरती मर्यादित नव्हती,तर संपुर्ण मानव जातीच्या कल्याणासाठी हाेती.अश्या या पवित्र सणाला मुस्लिम समुदायाकडुन सर्वात माेठी ईद म्हनुन ही आेळखली जाते.या निमीत्त मुस्लिम बांधव आपली घरे,दुकाने व परिसरात सजावट करतात.विद्युतर राेषणाईसह हिरवे झेंडे,पताका लावुन परिसर सजविला जाताे.तसेच विवीध शहरांमधुन सकाळी किंवा दुपारी जुलुस,अर्थात पैंगबर जयंतीची मिरवणुकांचे आयाेजन केले जाते.

---लाखनी येथे ही आज दि.२१-११-२०१८ ला ईद-ए- मिलादुन्नबी च्या राेजी सर्व मुस्लिम समुदायाकडुन सकाळी ९ वाजता सुन्नी हनफी बरेलवी मस्जिद कडुन मिरवणुक रैली माेठ्या उत्साहात काढुन तहसील कार्यालय चाैक ते हाजी अहमद शाह (र.अ.) दरगाह पर्यंन्त ते लाखनी मस्जिद मधे समापण करण्यात आली.या 'ईद-ए- मिलादुन्नबी च्या मिरवणुक रैली मधे प्रामुख्याने हाजी यासीन आकबानी, माेहसीन आकबानी, सलीम पटेल,परवेज आकबानी,छाेटु पठान,मुश्ताक सिद्दीकी,शफी लध्धानी,समदभाई भुरा,जावेद लध्धानी,अश्पाक सय्यद,हारुन शेख,जँकी कुरैशी, जफर भाई शेख,लाला मिस्त्री,राजु भाई,रियाज भाई (रिज्वी),दाऊद भुरा ईत्यादी मुस्लिम बांधव उपस्थित हाेते।
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours