मुंबई, 21 नोव्हेंबर : 14 लाख रुपये लाच घेतल्या प्रकरणी भिंवडी प्रांत अधिकाऱ्याच्या स्टेनोला अटक करण्यात आली आहे. एका जमिन व्यवहाराबाबत ही लाच मागितली असल्याचं सांगण्यात येत आहे. लाच घेताना त्यांना पोलिसांकडून त्यांना अटक करण्यात आली आहे.
ठाणे एसीबीने ही कारवाई केली आहे. या प्रांत अधिकाऱ्याने त्याच्या पीएमार्फत ही लाच घेतली होती. या प्रकरणात ताब्यात घेतलेल्या स्टेनोची कसून चौकशी करण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
दरम्यान, अद्याप लाच घेणाऱ्या व्यक्तीचं नाव समोर आलेलं नसून या प्रांत अधिकाऱ्याचा काही संबंध आहे का हे पाहण्यासाठी आता प्रांत अधिकाऱ्यांचीही चौकशी होणार असल्याचं सांगण्यात येत आहे
Post A Comment:
0 comments so far,add yours