21 नोव्हेंबर : मोदी सरकारनं प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख रुपये जमा होणार असल्याचं सांगितलं होतं, पण ते काही झालं नाही. आता राम मंदिर हा सुद्धा 15 लाख रुपयांसारखा जुमला आहे काय ?, असा सवाल शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला आहे. ते मुंबईत एका कार्यक्रमात बोलत होते. फक्त निवडणुकीच्या काळात भाजपाला राम मंदिराची आठवण येते. निवडणूक झाल्यानंतर भाजपा राम मंदिराची घोषणा विसरतो, असा टोलाही उद्धव ठाकरेंनी लगावला. दरम्यान, उद्धव ठाकरे अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्यांना पाठिंबा देण्यासाठी मुंबईतून वारकरी अयोध्येला निघाले आहे. एका विशेष रेल्वेनं मोठ्या संख्येनं हे वारकरी टाळ मृदुंगाचा गजर करत अयोध्येला निघाले आहेत. 25 नोव्हेंबरला उद्धव ठाकरे अयोध्या दौ-यावर जाणार आहेत.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post A Comment:
0 comments so far,add yours