मुंबई, 27 जुलै : मुंबई, ठाणे, डोंबिवली-कल्याण परिसरात शुक्रवारपासून (26 जुलै) मुसळधार पाऊस सुरू आहे. आजही पहाटेपासून पावसाचा जोर कायम आहे. यामुळे बऱ्याच ठिकाणी पाणी साचल्यानं वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान, शनिवारी (27 जुलै) आणि रविवारी (28 जुलै) देखील मुंबई शहर आणि उपनगरात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर, आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडू नये आणि समुद्र किनाऱ्यावर जाऊ नये, असं आवाहन प्रशासनाकडून नागरिकांना करण्यात आलं आहे.
मुसळधार पावसाचा इशारा
येत्या 48 तासांत मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. तसंच कोकणातही जोरदार पावसाचा अंदाज आहे.
'शाळांना सुट्टी देण्याचा निर्णय मुख्याध्यापकांनी घ्यावा'
पावसाची परिस्थिती पाहून शाळा प्रशासन आणि मुख्याध्यापकांनी सुट्टी देण्याचा निर्णय घेऊ शकतात, अशी सूचना शालेय शिक्षण मंत्री आशीष शेलार यांनी दिली आहे. ट्विटरद्वारे त्यांनी ही माहिती दिली आहे.
Post A Comment:
0 comments so far,add yours