बीड,- दारूड्या नवऱ्याच्या त्रासाला कंटाळून माया गावंडे या महिलेने चक्क गावातील हातभट्टीवर मोर्चा वळवत ती उध्दवस्त केली. 'माझा नवरा रिक्षाचालक आहे, रोज दारु पिऊन येतो. मारहाण करतो, संसार उध्दवस्त झाला आहे. घराच्या शेजारीच हातभट्टी मिळते. वारंवार पोलिसांना निवेदन दिले, पण ही दारु बंद झाली नाही.' असे सांगत परळी तालुक्यातील हिवरा गावातील माया गावडे या महिलेने गावांतील महिलांना एकत्रित करत चक्क दारुची हातभट्टी उध्दवस्त केली.यानंतर पोलिसांनी कारवाई केली. या महिलेच्या धाडसाचं सर्वत्र कौतुक होत आहे. पंकजा मुंडेंच्या जिल्ह्यात महिलांची ही पोलिसगीरी चर्चेचा विषय ठरली आहे.
परळी तालुक्यातील हिरवा गावातिल बेकायदेशीर हातभट्टी सुरु होत्या. यामुळे अनेक महिलांचे संसार उध्दवस्त झाले. दारुबंदीसाठी आता गावच्या महिलांनी पुढाकार घेतला आहे. समाजसेविका सत्यभामा सौंदरमल यांच्या मार्गदर्शनाखाली या लढल्या. यश आले. मात्र, या महिलांना गावातील गावगुंड त्रास देत आहेत. यामुळे पोलीस प्रशासननानेच कठोर कारवाई करावी, अशी मागणी या महिलांनी केली आहे.
पीडित महिला माया गावडे यांना गावांतील हातभट्टी चालकांनी दारुची नासधूस का केली, म्हणत हातभट्टी विक्रेत्याने अंगणवाडी मदतनीस माया गावडे व तिच्या कुटूंबाला धमक्या देत नुकसान भरपाईची मागणी केली होती. यानंतर सिरसाळा पोलिस स्टेशनचे सपोनि डोंगरे यांनी हिवरा गावी जाऊन हातभट्टी चालकावर कारवाई केली.
माया गावडे ही अंगणवाडी मदतनीस तर नवरा रिक्षाचालक आहे. पण नवरा दारूच्या आहारी गेल्याने घरात सतत भांडणे, गेल्या 8 दिवसांपासून सुरू आहेत. म्हणून माया गावडे यांनी दारूच्या हातभट्टीवर जावून दारूचे सामान फोडले. रसायन विहिरीत टाकले होते. या या बाबतीत सर्व स्तरातून माया यांचे कौतुक होत आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours