जम्मू-काश्मीर, 2 नोव्हेंबर : जम्मू-काश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यात गुरुवारी सायंकाळी भाजपचे राज्य सचिव अनिल परिहार आणि त्याचे बंधू या दोघांची गोळी घालून हत्या करण्यात आलीय. सगळ्यात धक्कादायक म्हणजे अनिल परिहार यांना राज्य शासनाने सुरक्षा प्रदान करण्यात आली होती. पण असं असतानाही त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या.

ज्यावेळी त्यांच्यावर हल्ला झाला तेव्हा ते किश्‍तवाड़मधल्या तपन गली या भागात असलेल्या घरी आपल्या भावासमवेत जात होते. त्याचक्षणी त्यांच्यावर हा हल्ला झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळावर पोहोचले. या घटनेनंतर किश्‍तवाड जिल्ह्यात कर्फ्यू लावण्यात आला आहे. 

प्राप्त माहितीनुसार जम्‍मू-कश्‍मीरच्या किश्‍तवाडमध्ये गुरुवारी भाजपचे राज्य सचिव अनिल परिहार आणि त्यांचे बंधू यांची अज्ञात हल्लेखोरांनी गोळी घालून हत्या केली. परिहार हे भारतीय जनता पक्षाचे जम्मू-कश्मीरचे राज्य सचिव होते आणि त्यांच भाऊ सरकारी कर्मचारी होते. गुरुवारी सायंकाळी दोघेही तपन गली या भागात असलेल्या घरी जात होते. तेवढ्यात अचानक त्यांच्यावर हल्ला झाला. राज्य शासनाने अनिल परिहार यांना सुरक्षा प्रदान केली होती.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours