मुंबई: सुपरस्टार कमल हासन यांची मुलगी अक्षरा हासन हिनं अखेर मुंबई पोलिसांच्या सायबर सेलकडे तक्रार नोंदवली आहे. अक्षराची काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर जोरदार चर्चा होती. तिचे काही प्रायव्हेट फोटो सोशल मीडियावर लीक करण्यात आले होते. तिला यावरून बरंच ट्रोल करण्यात आलं होतं.

तिच्या या अर्धनग्न फोटोंमुळे सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं होतं. अक्षराच्या या फोटोंमध्ये ती अंडरगार्मेंट्सवर सेल्फी घेताना दिसते आहे.

पण या फोटोत खरंच अक्षरा आहे की फोटोंसोबत छेडछाड करण्यात आली आहे हे अद्याप समजू शकलेलं नाही.

अक्षरानं नोंदवलेल्या तक्रारीनुसार, कुण्या एका व्यक्तीनं तिचे हे खासगी फोटो सोशल मीडियावर लीक केले. हे कृत्य कुणी, कधी आणि कसं केलं याविषयी मला काही माहिती नाही, कल्पना नाही. पण हे खूपच दुर्दैवी आहे, असं अक्षरा म्हणाली. मुंबई पोलिसांनी मला या गैरकृत्य करणाऱ्याला शोधायला मदत करावी, अशी विनंती अक्षरानं पोलिसांकडे केली आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours