जालना- 'सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे काय मागता, एखाद्या बॉम्बला बांधून राहुल गांधीला पाठवायचं होतं दुसऱ्या देशामध्ये मग कळले असतं, असे वादग्रस्त विधान पंकजा मुंडे यांनी केलं आहे. जालना जिल्ह्यातील जामखेड येथे भाजपप्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या प्रचारसभेत त्या बोलत होत्या.
सभेला संबोधित करताना पंकजा यांची जीभ घसरली. त्यांनी राहुल गांधी यांचा एकेरी उल्लेख केला. तसेच धनंजय मुंडे यांच्यावर सडकून टीका केली.  कोणीही लोकल नेते पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करत आहे. सर्जिकल स्ट्राईकवर जे कोणी प्रश्न उपस्थित करतात त्यांना त्या एखाद्या ठिकाणी हेलिकॉप्टरमध्ये सोडलं पाहिजे, असे सांगत धनंजय मुंडे यांच्या मोदींवरील टीकेला प्रत्युत्तर दिले.
महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यातील निवडणुकांच्या प्रचारतोफा रविवारी थंडावणार आहे. रावसाहेब दानवे यांच्या प्रचाराची शेवटची सभा पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत पार पडली. दानवे हे प्रकृती अस्वास्थामुळे रॅली ऐवजी कार्यकर्त्यांची मिटिंग आणि प्रचारसभामध्येच हजेरी लावत आहेत.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours