जळगाव, 22 एप्रिल : जळगाव लोकसभा मतदारसंघाचे भाजप उमेदवार उन्मेष पाटील यांच्या वडिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी उन्मेष पाटील यांचे वडील भैय्यासाहेब पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
जळगाव भाजपमध्ये गेल्या काही दिवसांपासून अंतर्गत धुसफूस समोर येत आहे. अशातच आता भाजपचेच नेते असलेल्या कैलास सूर्यवंशी यांनी भैय्यासाहेब पाटील यांच्याविरोधात धमकी दिल्याची तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे मतदानाला काही दिवस बाकी असतानाच उन्मेश पाटील यांच्यासमोरील अडचणी वाढल्याचं बोललं जात आहे.
जळगावमधील लोकसभेचा रणसंग्राम
जळगाव जिल्ह्यातील रावेर आणि जळगाव लोकसभा मतदार संघाची निवडणूक होतेय. ही निवडणूक फक्त उमेदवार निवडण्यासाठी होणार नाही. जळगाव जिल्ह्याचा भावी नेता कोण? हेही ठरवणारी आहे, हे निश्चित.
जिल्ह्यात एकनाथ खडसे यांच वर्चस्व राहीलं आहे. सतीश पाटील, सुरेश जैन, मनीष जैन यांचा अपवाद वगळला तर खडसेंना जिल्हाभर विरोध करण्याची हिंमत कुणी दाखवली नाही. मंत्रिपदावरुन पायउतार झाल्यानंतर मात्र गिरीश महाजन यांनी खडसेंचा गडाला अक्षरशः सुरुंग लावले. महापालिका, जिल्हा परिषद, विधान परिषद या निवडणुकीत भाजपला न भूतो असं यश मिळवून दिलं. आता लोकसभेच्या निमित्ताने पुन्हा दोन्ही नेते रिंगणात आहेत. रावेरचा गड खडसेंना राखायचा आहे तर गिरीश महाजन यांनी आपाल्या उमेदवारसाठी प्रतिष्ठा पणाला लावलीय.
खडसे-महाजन यांची ही निवडणूक वाटत असली तरी खरी लढाई भविष्यात जिल्ह्यावर कोण सत्ता गाजवले याची आहे. रक्षा खडसे आणि उन्मेष पाटील यांच्यामधून जिल्ह्याचा नेता कोण होईल? या वर्चस्वाची सुरवात आहे. रक्षा खडसे अत्यंत आक्रमक नेत्या आहेत, कामाचा सपाटा, अभ्यास, मतदार संघावर पकड, गतीमान हालचाली हे त्यांचं वैशिष्ट्य आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours