मुंबई, जर तुमचं वय 16 वर्ष असेल तर आता तुम्हीदेखील ड्रायव्हिंग लायसन्स काढू शकता. वय लहान आहे पण तुम्हाला दुचाकी आणि चारचाकी चालवता येत असेल तर आता तुम्हीही ड्रायव्हिंग लायसन्स काढू शकता.

खरंतर केंद्र सरकारने ड्रायव्हिंग लायसन्स बनवण्यासाठी 18 वर्षांची मर्यादा ठेवली होती ती आता कमी करत 16 वर्षांची करण्यात आली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्रालय यासाठी लवकरच अधिसूचना जारी करणार आहे. यात अट एकच असेल की, दुचाकी 50 सीसीपेक्षा जास्त नसली पाहिजे. बरं इतकंच नाही तर वाहनांच्या स्पीडवरही मर्यादा दिल्या जातील.

लवकरच यासंबंधीच्या अधिसूचना आम्ही काढू असं परिवहन तज्ज्ञांकडून सांगण्यात आलं आहे. देशात तब्बल 20 लाख अल्पवयीन मुलं-मुली आहेत जे ड्रायव्हिंग लायसन्सशिवाय गाडी चालवतात. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours