सांगली:  केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे आपल्या अघळपघळ वक्तव्यांसाठी प्रसिद्ध आहेत. कुठलीह भीडभाड न ठेवता ते वक्तव्य करतात आणि वादात सापडतात. मला जे वाटतं ते बोलतो, परिणामांची चिंता करत नाही असं त्यांनी अनेकदा सांगूनही टाकलंय. आता त्यांनी हिजड्याविषयी वक्तव्य केल्याने नवा वाद निर्माण झालाय.

सांगलीत नितीन गडकरींनी केलेल्या वक्तव्याने ते पुन्हा वादात सापडले आहेत. एका कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले, सिंचन योजना पूर्ण करणं हे कठीण काम आहे. एवढा बटट्याबोळ त्याचा करून ठेवला गेला. मागे मला एक शिष्टमंडळ भेटायला आलं होतं. मी त्यांना म्हणाले की हिजड्याचं लग्न लावून दिलं तर त्याला मुलं होतील पण या सिंचन योजना कधीच पूर्ण होणार नाहीत.
सभेत बोलताना गडकरींनी असं वक्तव्य करावं का असं बोललं जात आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours