जालना:  जालना इथं सुरू असलेली कुस्तिची दंगल लक्षवेधी ठरली. बुलडाण्याच्या बाला रफिक शेख याने पुण्याच्या अभिजित कटकेचा पराभव करत मानाचा महाराष्ट्र केसरी हा किताब जिंकला. अतिशय काट्याची लढत अभिजित आणि बालामध्ये झाली. पहिल्या काही फेऱ्यानंतर बाला वरचढ ठरला त्याने टाकलेले डाव अभिजितला उलटवता आहे नाही आणि बाला विजेता ठरला.

मंत्री अर्जुन खोतकर, विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांच्या हस्ते त्याला चांदीची गदा देण्यात आली. मैदानावर जोरदार जल्लोष झाला. लोकांनी आणि समर्थकांनी बालाला डोक्यावर घेतलं आणि रोजदार घोषण दिल्या.

पुण्याच्या अभिजीत कटकेनं महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत सलग तिसऱ्यांदा अंतिम फेरीत धडक मारली होती . मागील वर्षी चॅम्पियन बनलेल्या अभिजीत कटकेनं महाराष्ट्र केसरी वजन गटाच्या गादी गटात सुवर्णपदक जिंकलं होतं.  प्रतिष्ठित महाराष्ट्र केसरी किताबासाठी पुण्याचा अभिजीत कटके आणि बुलढाणा इथल्या बालारफिक शेख यांच्यातला सामना जोरदार रंगला.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours