जिल्हा प्रतिनिधी शमीम अकबानी
 भंडारा, दि. 4:-  जिल्हयात 6 डिसेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरीनिर्वाण दिन उत्सव साजरा करण्यात येणार आहे. या दिनानिमित्त बौध्द बांधव विहारात पुजा अर्चना करीत असतात. कॅन्डल रॅलीचे आयोजन करीत असतात. तरी जिल्हयात कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी. तसेच विद्युत भारनियमन बंद करावे, शेतकऱ्यांना बि-बियाणे व खते योग्य वेळी रास्त भावात मिळण्यात यावे, शेतकऱ्यांसाठी लाभकारी योजना घोषित कराव्यात, दुष्काळग्रस्त भागात रोजगार उपलब्ध करुन द्यावे. शेतीसाठी आवश्यक बि-बियाणे शासनाने रास्त किंमतीत द्यावे अशा विविध मागण्यांना घेवून राजकीय पुढारी, मजूरवर्ग व शेतकरी वर्गाला हाताशी धरुन धरणे, मोर्चे, आंदोलन व निदर्शने आयोजित करण्याची शक्यता नाकारता येत नाही
 स्थानिक कायदा व सुव्यवस्थेची प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकरता येत नाही.  जिल्हयात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये, शांतता कायम टिकून राहावी म्हणून  14डिसेंबर  2018 पर्यंत जिल्हादंडाधिकारी  शांतनू गोयल यांनी कलम 37 (1) (3) लागू केले आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours