जिल्हा प्रतिनिधी शमीम अकबानी
पडताळणी मुद्रांकनाबाबत 42 लाखाची वसूली
भंडारा,दि. 4 :- वैध मापन शास्त्र भंडारा व गोंदिया या कार्यालयाचे सहाय्यक नियंत्रक रा.व. भास्करे यांचे मार्गदर्शनाखाली दिवाळी मोहिम राबविण्यात आली. सदर मोहिमेत डब्यासहित मिठाईचे वजन केल्याबाबत 2 विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली. तसेच आवेष्टित वस्तू नियम व वजन माप नियम भंग केल्याबाबत एकूण 15 विक्रेत्यांवर कारवाइर् करण्यात आली. ऑक्टोंबर 2018 अखेर पर्यंत फेरीवाले, दुकानदार यांचेविरोधात एकूण 152 प्रकरणे नोंदविली. तसेच तराजू , वजन मापे, इलेक्ट्रानिक्स काटे यांचे पडताळणी मुद्रांकनाबाबत 42 लाख फि वसूल करण्यात आली. सदर मोहिमेत निरीक्षक कोहरु, खुरसडे, तोंडरे, मुल, भारती नंदेश्वर या कर्मचाऱ्यांनी भाग घेतला.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours