मुंबई : मराठा आरक्षणासाठी स्थगित करण्यात आलेली मेगा भरती आता पुन्हा सुरू होणार आहे. 72 हजार पदांसाठी ही भरती होणार आहे. पुढच्या आढवड्यात त्याची जाहीरात प्रसिद्ध होणार आहे. तर फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात भरती परिक्षा होईल. प्रत्येक विभाग निहाय ही भरती प्रक्रिया होणार असून एकाच दिवशी 72 हजार पदांसाठी परिक्षा होणार आहे. त्यासाठी प्रशासनाने तयारीला सुरुवात केलीय. महसूल,कृषी, आरोग्य, PWD, गृह,जलसंधारण, वित्त अशा विविध विभागांमध्ये ही मेगाभरती होणार आहे.
अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही महत्वाची घोषणा केली होती. राज्यातल्या विविध 72 हजार पदासांठी  काही महिन्यांपूर्वी ही मेगाभरती राज्य सरकारनं घोषीत केली होती मात्र त्यावर वाद झाल्याने ती थांबवण्यात आली होती
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours