मुंबई, 04 डिसेंबर : सामनाच्या अग्रलेखातून वारंवार राज्याचे मुख्यमंत्री, पंतप्रधान आणि भाजपवर टीका केली जाते. आताही अशीच टीका सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आली. गिरीष महाजन यांनी मुख्यमंत्र्यांच्या नावाने अंगारे-धुपारे उडवले आहेत असं सामनात म्हटलं आहे.

तर व्यक्तिश: मुख्यमंत्री आम्हाला प्रिय आहेत त्यामुळे अशा आरतीबाज लोकांपासून सावध राहिले पाहिेजे असं लिहून सामनातून भाजप आणि गिरीष महाजन यांच्यावर सडकून टीका केली.

काय लिहलं आहे सामनाच्या अग्रलेखात

"महाराष्ट्रात शेतकरी, कष्टकरी रस्त्यावर आहे व दैवी चमत्कार संचारलेले मुख्यमंत्री असतानाही बेळगावसह सीमा भागात मराठी माणूस चिरडला जात आहे. दैवी चमत्कारच आता सीमा प्रश्न सोडवू शकेल व ती ‘पॉवर’ आज फक्त मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे आहे! गिरीश महाजन यांनी मुख्यमंत्र्यांच्या नावाने अंगारे–धुपारे उडवले आहेत. अंधश्रद्धा निर्मूलनवाले नरेंद्र दाभोलकर यांचा आत्माही आता सांगत असेल, माझे खुनी पकडू नका! मुख्यमंत्र्यांनी अशा आरतीबाज लोकांपासून सावध राहिले पाहिजे. ते आम्हाला व्यक्तिशः प्रिय आहेत म्हणून हा प्रपंच."

एकीकडे सामनातून भाजपवर सडकून टीका तर भाजप आणि शिवसेना हे दोनही पक्ष हळुहळू आता जवळ येताना दिसत आहेत. बंजारा समाजाची काशी असलेल्या वाशिम जिल्ह्यातल्या पोहोरादेवी इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकत्र नगारे वाजवले. दोनही नेत्यांनी एकत्र येत वाजवलेले नगारे म्हणजे राज्यात युती होण्याचे संकेत मानले जात आहेत. गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि मुख्यमंत्र्यांवर कायम टीका करणारे उद्धव ठाकरे सातत्यानं मुख्यमंत्र्यांसोबत एका व्यासपीठावर येत असल्यानं युतीचं आता पक्क मानलं जातं आहे.

सामना'मधून सातत्याने नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री आणि भाजपवर कडवट टीका होत असते. उद्धव ठाकरेही सातत्याने हल्लाबोल करत असतात. शिवसेनेचे मंत्री खिशात राजीनामे घेऊन फिरतात अशी घोषणा झाली. त्याची यथेच्छ टिंगली करण्यात आली. मात्र चार वर्षानंतरही हे राजीनामे बाहेर कधी निघालेच नाही.

तर दुसरीकडे, सोमवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी अचानक बोलावलेल्या बैठकीत सगळ्या मंत्र्यांना दुष्काळग्रस्त गावांचा आढावा घेण्याचे आदेश दिल्याचं सांगण्यात येत आहे. तसंच त्याचा अहवाल अहवाल सादर केल्यावर स्वत: उद्धव ठाकरे दुष्काळग्रस्त गावांचा दौरा करणार असल्याची माहिती शिवसेना नेते एकनाथ शिंदेंनी दिलीय.

सेनेच्या या बैठकीत सरकारनं दुष्काळग्रस्त भागात जाहीर केलेल्या योजनांची अंमलबजावणी होतेय की नाही याची माहिती घेण्याचे निर्देश दिलेत. सोबतच मंत्रिमंडळाच्या बैठकीत आक्रमकपणे जाब विचाराण्याचे आदेशही देण्यात आलेत.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours