मराठा आरक्षण न्यायालयात सुनावणी
राज्य सरकारने मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण जाहीर केलं आहे. मराठा समाजाच्या निर्णयाविरोधात ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी याचिका दाखल केली. मागील सुनावणीदरम्यान कोर्टाने मेगा भरतीवरून राज्य सरकारला फटकारलं होतं. आज या याचिकेवर पुन्हा सुनावणी होणार आहे.
भाजप आमदारांची वर्षावर बैठक
पाच राज्यातील पराभवानंतर भाजपने मिशन महाराष्ट्र सुरू केलं आहे. भाजपचे अध्यक्ष अमित शहा मुंबईत दाखल झाले आहे. मध्यरात्री अमित शहा यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार यांच्यासह इतर मंत्र्यांसोबत बैठक पार पडली. आज मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी भाजपच्या सर्व आमदारांची बैठक बोलावण्यात आली आहे.
भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्त्रो जीसॅट-7ए हे उपग्रहाचे प्रक्षेपण करणार आहे. श्रीहरीकोटा येथून या उपग्रहाचे प्रक्षेपण होणार आहे. 2250 किलो वजनी हा उपग्रह आहे. या उपग्रहामुळे दळणवळणाची प्रक्रिया आणखी सुलभ होईल. या उपग्रहाची निर्मिती इस्रोनेच केली आहे.
योगी सरकारचा पुरवणी अर्थसंकल्प
उत्तरप्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ सरकार आपले दुसरे पुरवणी अर्धसंकल्प सादर करणार आहे.हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हा अर्थसंकल्प सादर करणार आहे. त्यामुळे योगी सरकार काय घोषणा करणार याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे.
पुण्यात म्हाडाच्या घरांची लाॅटरी
पुण्यात आज म्हाडाच्या घरांची लाॅटरी काढण्यात येणार आहे. मुंबईनंतर पुण्यात म्हाडाने स्वस्त घरांसाठी योजना काढली होती. फ पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील ८१२ नवीन घरांसाठीची सोडत जाहीर झाली आहे. आज या घरांची सोडत काढण्यात येणार आहे.
Post A Comment:
0 comments so far,add yours