कल्याण: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंगळवारी 18 डिसेंबरला कल्याणमध्ये मेट्रोचं भूमीपूज होणार आहे या कार्यक्रमावरुन भाजप शिवसेनेत श्रेयवादाची लढाई सरू सुरू झालीय. कार्यक्रमाला आता काही तास राहिले असताना अजुनही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यात आलेलं नाही. कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेना आणि भाजपची सत्ता आहे. असं असताना उद्धव ठाकरे यांना निमंत्रण देणं अपेक्षीत होतं. या प्रकारामुळे शिवसैनिकांमध्ये नाराजी पसरली आहे.
पंतप्रधानांच्या दौऱ्यापूर्वी कल्याणमध्ये बॅनर युद्ध रंगलंय. मेट्रोचं श्रेय घेण्यावरुन भाजप-शिवसेनेत चढाओढ सुरू झालीय. भाजप आणि शिवसेनेने सर्व शहरात बॅनर्स लावले असून आपल्यामुळेच हा प्रकल्प होत असल्याचा दावा केलाय.
मेट्रो भूमिपूजनाच्या निमित्तानं भाजपला श्रेय घेण्याची आयतीचं मिळाली. भाजपनं कल्याण - डोंबिवलीच्या नाक्या नाक्यावर बॅनरबाजी केलीय. तर शिवसेनेनं बॅनरच्या माध्यमातून त्याला प्रत्युत्तर दिलय. विशेष म्हणजे कल्याण डोंबिवली महापालिकेत भाजप-सेना युतीची सत्ता आहे. महापालिकेत
Post A Comment:
0 comments so far,add yours