मुंबई, 08 डिसेंबर : छोटा राजनचा सहकारी आणि गँगस्टर डी.के.रावचा नजिकचा सहकारी टीपी राजा याची राहत्या घरी हत्या करण्यात आली आहे. वडाळा कोळीवाडा इथं राहणाऱ्या या गुंडाची घरात घुसून अज्ञात दोघांनी हत्या केली असल्याचं सांगण्यात येत आहे.
मृतक कानाम मरीमुथु पेरियास्वामी देवेंद्र उर्फ टीपी राजा असं त्याचं नाव आहे. तो वडाळ्यामध्ये म्हाडा कॉलोनीच्या डी 3 इमारतीत चौथ्या मजल्यावर राहतो. दुपारी साडे तीन वाजताच्या सुमारास ही हत्या केली असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.
हत्यारे बाईकवरून इमारतीत शिरले. ते त्याच्या घरी गेले. त्याच्यावर चाकूने वार करत त्याची हत्या केली आणि दरवाजा बंद करून पळून गेले. पण आरोपींच्या कपड्याला लागलेल्या रक्तामुळे लोकांना शंका आली त्यांनी पोलिसांना याबद्दल सांगितलं.
पोलीस घटनास्थळी पोहचले. त्यांनी दरवाजा उघडला. तेव्हा टीपी राजाला इतकं बेदम मारलं होतं की त्याचा अर्धा मृतदेह हा खिडकीला लटकवण्यात आला होता. पोलिसांनी त्याचा मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.
तर पोलीस आता या संपूर्ण प्रकरणाचा कसून तपास करत आहेत. पण या संपूर्ण प्रकारामुळे परिसरात भीतीचं वातावरण आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours