नांदेड : पैशाचं, अन्नाचं, कपड्यांचं दान सगळ्यांना माहित आहे. मात्र अवयवांचं दान होऊ शकतं आणि त्यामुळे दुसऱ्यांचे प्राण वाचू शकतात याची जाणीव अजुनही समाजात रूजलेली नाही. मात्र नांदेड जिल्ह्यातल्या एका मजुराच्या कुटुंबीयांनी दाखवलेल्या औदार्यामुळं डॉक्टरांना चार जणांचे प्राण वाचवण्यात यश मिळालं.

लोहा तालुक्यातील माळकोळी इथला 30 वर्षांचा भुजंग मस्के हा रंगकाम करण्यासाठी सोलापूरला गेला होता .. भासलेगाव येथे मंदिराचे रंगकाम करताना तो पाय घसरून खाली पडला. 26 नोव्हेंबरला ही घटना घडली होती. डोक्याला गंभीर मार लागल्याने त्याला सोलापूर आणि नंतर नांदेडच्या खाजगी रुगणालयात उपाचार सुरू होते .
पण त्याचं ब्रेनडेड झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. ब्रेनडेड झालेल्या तरुणाचे सर्व अवयव चांगले असल्याने डॉक्टरांनी त्याच्या कुटुंबीयांना अवयवदान करण्याचा सल्ला दिला. भुजंगमुळे जर काही लोकांना जीवदान मिळणार असल्याने त्याच्या कुटुंबीयांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने अवयवदान करण्याचा निर्णय घेतला आणि आपल्यातल्या दातृत्वाचं दर्शन घडवलं.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours