मुंबई: शिवसेना आगामी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंग उत्तर महाराष्ट्रातून फुंकणार आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जळगाव जिल्ह्यातील पाचोऱ्यात 15 फेब्रुवारीला सभा घेणार आहेत.
गेल्या काही दिवसांपासून शिवसेना भाजप यांची युती होणार की नाही यासंदर्भात चर्चा सुरू असताना शिवसेनेने मात्र एकला चलोची भूमिका घेतली आहे.
शिवसेना पक्षप्रमुख सोमवारीच सर्व खासदारांची विभागवार बैठक घेतली होती. या बैठकीत संभाव्य उमेदवारांच्या नावाची चर्चा झाली होती. तसेच 2014 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने ज्या मतदारसंघात निवडणूक लढवली नव्हती तेथील परिस्थितीचा आढावा घेण्यात आला होता.
शिवसेनाच मोठा भाऊ
शिवसेनेच्या खासदारांची बहुचर्चित बैठक सोमवारी मुंबईत झाली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी खासदारांना मार्गदर्शन केलं. खासदार संजय राऊत यांनी बैठकीची माहिती पत्रकारांना दिली. शिवसेनेच्या या बैठकीनंतरही युतीबाबत शिवसेनेने संदिग्ध भूमिकाच दिसून आली. महाराष्ट्रात शिवसेनाच मोठ्या भावाच्या भूमिकेत आहे आणि यापुढेही राहिल असं संजय राऊत यांनी वारंवार सांगत शिवसेनेची भूमिका अजुनही नरमलेली नसल्याचेच संकेत दिलेत.
जवळ आलेल्या लोकसभेच्या निवडणुका आणि भाजपकडून वारंवार दिला जाणारा युतीचा प्रस्ताव यामुळे शिवसेनेच्या या बैठकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. गेल्या काही दिवसांपासून भाजपकडून युतीबाबत चर्चा सुरू असल्याची माहितीही दिली जात होती. मात्र भाजपकडून युतीचा कुठलाही प्रस्ताव आला नसल्याचं राऊत यांनी स्पष्ट केलं. शिवसेना दिल्लीचं तख्त हलवेल असंही त्यांनी सांगितलं.
Post A Comment:
0 comments so far,add yours