सातारा : साताऱ्यातल्या पोलादपुरच्या आंबेनळी घाटात पुन्हा एकदा भीषण अपघात झाला आहे.यात ट्रक चालकाचा जागीच मृत्यू झाला असून एक जण बचावला असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. दरम्यान, फर्श घेऊन जाणारा हा ट्रक होता. ट्रकमध्ये फक्त ड्रायव्हर आणि प्रवाशी असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

घटनेची माहिती मिळताच ट्रेकर्स आणि कार्यकर्ते घटनास्थळी दाखल झाले आहेत. पहाटेच्या सुमारास महाबळेश्वरहून आंबेनळी घाटातून जात असतना ट्रक चालकाचा अचानक ताबा सुटल्याने हा अपघात झाल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. 

आंबेनळी घाटात अपघात होण्याची संख्या वेगाने वाढत आहे. रस्ता अरुंद आहे. त्यात घाटाच्या बाजूला कठडे बांधण्यात आलेले नाही. त्यामुळे अपघात होत आहेत.

दरम्यान, 28 जुलै 2018 रोजी दापोली कृषी विद्यापीठांच्या प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांना घेऊन जाणारी बस पोलादपूर आंबेनळी घाटातील ८०० फूट खोल दरीत कोसळली होती. या दुर्घटनेत २९ जणांचा मृत्यू झाला होता. तर या अपघातातून प्रकाश सावंत देसाई हे एकमेव आश्चर्यकारक बचावले होते.

या एवढ्या भीषण अपघातानंतरही प्रशासनाला जाग आली नाही. अजूनही सुरक्षेच्या दृष्टीने आंबेनळी घाटात कोणतीही पावलं उचलली गेली नाही.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours