मुंबई : भाजप आणि शिवसेनेमध्ये युतीची चर्चा सुरू असल्याच्या बातम्या येत असतानाच महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी युती बाबत मोठा खुलासा केलाय. भाजप आणि शिवसेनेत युतीबाबत कुठलीही चर्चा सुरू नाही असं चंद्रकांत पाटील यांनी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं. त्यामुळे युतीबाबत पुन्हा संभ्रम निर्माण झाला आहे.

युतीतबाबत उलटसुलट बातम्या येत असताना सुरूवातीला आदित्य ठाकरे यांनी चर्चा सुरू असल्याचे संकेत दिले होते. नंतर रावसाहेब दानवे यांनी तसेच संकेत दिले. त्यानंतर दिल्लीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक विधान केलं होतं. त्यामुळे युतीची पडद्या आडून चर्चा सुरू असल्याचं स्पष्ट झालं.

मात्र चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा संभ्रम निर्माण झाला आहे. नेमकं खरं काय आहे याबाबतचं गुढ वाढलं आहे. तर दुसरीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आघाडीचं पक्क करत जागावाटपाचाही प्रश्न सोडवून टाकला. त्यामुळे काहीतरी निर्णय घ्या असा दबाव आता शिवसेनेवर वाढत जाणार आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours