औरंगाबाद: औरंगाबादमधील वादग्रस्त नगरसेवक सय्यद मतीन याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिटी चौक पोलीस ठाण्यात एका 30 वर्षीय महिलेने मतीनच्या विरोधात तक्रार केल्याने रात्री उशिरा त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नोकरी लावतो असं आमिष दाखवून गेल्या अनेक वर्षांपासून सय्यद मतीनने आपल्यावर बलात्कार केल्याचा आरोप पीडित महिलेनं केला आहे. महिलने तक्रार दाखल केल्याचं लक्षात येतात आरोपी नगरसेवक सय्यद मतीन फरार झाला आहे. 
दरम्यान, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या शोकसभेला विरोध केल्याने सय्यद मतीन हा वादात सापडला होता. शोकसभेला विरोध केल्याने सभागृहाताच भाजप नगरसेवकांनी मारहाण केली होती. त्यानंतर एमआयएमने असलेल्या सय्यद मतीनची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली.
वादानंतर मतीनला कायमची सभागृहबंदी करण्यात आलेली आहे. मतीनने नुकतंच एमआयएम नगरसेविकेसोबत पळून जाऊन लग्न केलं होतं. सय्यद मतीनच्या सततच्या वादग्रस्त वागणुकीने पक्ष अडचणीत येत असल्याने आमदार इम्तियाज जलील यांनी मागील महिन्यातच मतीनची पक्षातून हकालपट्टी केलेली आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours