डोंबिवलीत भाजप पदाधिकाऱ्याच्या दुकानातून मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. धनंजय कुलकर्णी असं या भाजप पदाधिकाऱ्याचं नाव आहे. कल्याण गुन्हे शाखेनं धनंजय कुलकर्णी याच्या दुकानावर धाड टाकत हा शस्त्रसाठा जप्त केला आहे. धनंजय कुलकर्णी या डोंबिवलीतील भाजपचा उपाध्यक्ष असून त्याचे स्थानिक भाजप आमदाराशी अत्यंत जवळचे संबंध असल्याचं बोललं जात आहे. भाजप पदाधिकारी धनंजय कुलकर्णी याच्या दुकानातून जप्त करण्यात आलेल्या शस्त्रांमध्ये चॉपर, तलवारी, एयरगन, फायटर्स, चाकू, सुरे, कुऱ्हाडी यांचा समावेश आहे. भाजपच्या पदाधिकाऱ्याकडे एवढा मोठा शस्त्रसाठा आढळल्यानं शहरात एकच खळबळ उडाली आहे.
Home
अपराध
महाराष्ट्र
मुंबई
चॉपर, तलवारी आणि कुऱ्हाडी...भाजपच्या पदाधिकाऱ्याकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post A Comment:
0 comments so far,add yours