श्रीपाद जोशींच्या राजीनाम्यावर देवानंद पवार यांची प्रतिक्रीया
यवतमाळ : लेखक, विचारवंत, पत्रकार व जनेतेने एकत्र येत नयनतारा सहगल यांचे उद्घाटक म्हणुन निमंत्रण रद्द करण्याच्या निर्णयाविरोधात आवाज उठवला. विचारांची अभुतपुर्व एकजुट झाल्याने अ.भा. मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी यांचा अहंकार धुळीस मिळाला अशी प्रतिक्रीया शेतकरी न्यायहक्क आंदोलन समितीचे निमंत्रक देवानंद पवार यांनी दिली.
श्रीपाद जोशी यांनी या विषयी अत्यंत अहंकाराने प्रतिक्रीया देत निमंत्रण रद्द करण्याची घटना सामान्य असल्याचे म्हटले होते. संपुर्ण महाराष्ट्राची मान खाली घालायला लावणारे हे कृत्य श्रीपाद जोशींनी कोणाच्या सांगण्यावरून केले हे स्पष्ट आहे. जोशींच्या राजीनाम्याने संमेलनावरील निराशेचे मळभ कमी झाले आहे. त्यामुळे आता संमेलन योग्य पद्धतीने पार पडावे अशीच आमची भुमिका आहे असे पवार म्हणाले.
मात्र संमेलनात आर्थिक खर्च कमीत कमी करून शिल्लक पडलेला निधी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंबांना सन्मानपुर्वक देण्यात यावा या मागणीवर आम्ही आजही ठाम आहोत. शिवाय शेतक-यांचा जीव घेणा-या बोगस किटकनाशक प्रकरणात लाखोंची लाच घेणारे अधिकारी, त्यामध्ये अप्रत्यक्ष सहभागी असलेले जिल्हा पोलीस अधिक्षक व वरिष्ठ अधिकारी यांची तातडीने उचलबांगडी करून उच्चस्तरीय चौकशी करावी. अन्यथा आम्ही मुख्यमंत्र्यांना संमेलन स्थळावर पायही ठेवू देणार नाही असा इशारा देवानंद पवार यांनी दिला.
Post A Comment:
0 comments so far,add yours