पुणे, 21 फेब्रुवारी : आंबेगाव तालुक्यात बोअरमध्ये पडलेल्या 6 वर्षांच्या रवी पंडित मिल याला बाहेर काढण्यात यश आलं आहे. एनडीआरएफची टीम आणि इतर यंत्रणांच्या अथक प्रयत्नांमुळे रवीला 17 तासांनंतर सुखरूप बाहेर काढण्यात आलं.
पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात बुधवारी सायंकाळी 4.30 वाजता 6 वर्षांचा रवी बोअरवेलमध्ये पडला. 200 फूट खोल असून सुदैवाने हा मुलगा 10 फूट खोलीवर अडकला होता. त्यानंतर त्याच्या सुटकेसाठी पोलिसांसह एनडीआरएफची टीमही प्रयत्न करत होती. अखेर आज सकाळी त्याला बाहेर काढण्यात आलं.
स्थानिक नागरिकांच्या मदतीने बोरवेलच्या बाजूने खोदकाम केले गेले. एनडीआरएफसोबतच आंबेगाव तहसीलदार, मंचर पोलिसांनीही या मुलाला बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. रवी हा मूळचा शेगाव पाथर्डीचा रहिवाशी असून त्याचे आई-वडील रस्त्याच्या कामात दगड फोडण्याचे बिगारी काम करतात.
रवीचे आई-वडील थोरांदळे जाधववाडी इथं रस्त्याचे काम करत असताना रवी आसपासच्या परिसरात खेळत होता. याच ठिकाणी तो खेळता-खेळता बोरवेलमध्ये पडला. त्याच्या आई-वडिलांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी मदतीसाठी धावाधाव केली. त्यानंतर मग रवीच्या बचावासाठी प्रयत्न सुरू झाली. आता अखेर 17 तासानंत बचावकार्य पूर्ण झाले आहे. 

Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours