■ प्रकरण अड्याळ तालुक्याचे ■
अनुपकुमार हातेल
चिचाळ, पवनी तालुक्यातील सर्वात मोठे गाव असलेल्या अड्याळ गावाला तालुका निर्मितीसाठी गेल्या २९ वर्षापासून शासनाला अनेकदा पाठपुरावा करूनही प्रकरण धूळखात पडल्याने पसिरातील संतप्त नागरिकांनी येणाऱ्या निवडणूकिवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.त्या अनुषंगाने पालोरा येथे भंडारा-गोंदिया विधान परिषद क्षेत्राचे आमदार डॉ. परिणय फुके यांना अड्याळ तालुका संघर्ष समितीच्यावतीने निवेदन देऊन तालुक्याची मागणी केली आहे.                  
        अड्याळ हे गाव  भंडारा जिल्ह्यातील  गोसे खुर्द प्रकल्पाच्या पोटातील गाव आहे. अड्याळ परिसरातील ९0 गावातील जनतेला जिल्हास्थळी ४0 किमी व पवनी तालुक्याला २0 किमी अंतराचा पल्ला गाठावा लागतो. अड्याळ येथे महाविद्यालय, हायस्कूल, प्राथमिक, माध्यमिक शाळा, महसूल तालुका अधिकारी कार्यालय, शासकीय गोडावून, पोलिस स्टेशन तर शासकीय, निमशासकीय कार्यालये आहेत. शिक्षणासाठी १ ते २ हजार विद्यार्थ्यांची नेहमी वर्दळ असते. परिसरातील प्रकल्पग्रस्तांची तहसीलच्या कामासाठी शासनाने दोन दिवसाचे नायब तहसील कार्यालय दिले आहे. मात्र, नायब तहसीलदार कार्यालयात कधी येतील, हे खरे नाही. त्यामुळे ते फलक शोभेचे ठरले आहे. गोसे धरणामुळे अड्याळचे मोठे नुकसान झाले. परिसराचा विकास करावायचा असेल तर अड्याळला तालुक्याचा दर्जा मिळाला पाहिजे. विद्यार्थी व नागरिकांना क्षुल्लक कारणासाठी पवनी येथे जावे लागते. त्यामुळे शारिरिक, मानसिक व आर्थिक भूर्दंड सोसावा लागतो. परिणय फुके यांना अड्याळ तालुका संघर्ष समितीने दिलेल्या निवेदनात निवडणुकी अगोदर तालुका घोषित करा,स्मशानभूमी शेडचे बांधकाम, प्रवासी निवारा, आदी मागण्याचे निवेदन देण्यात आले. सदर समस्या मुख्यमंत्री यांचेशी चर्चा करुन एक महिण्यात समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.  

          निवेदन देतेवेळी माजी शिक्षणमंत्री विलास श्रूंगारपवार,माजी जि.प.सदस्य देवेद्र हजारे, सरपंचा जयश्री कुंभलकर, धनंजय मुलकलवार,मुनीर शेख,राजु मुरकुटे, नंदलाल मेश्राम, चिंतामन वाघमारे, माजी पं.स. शरद काटेखाये , डॉ. हर्षवर्धन कोहपरे, डॉ. संघरत्ने,राहुल खोब्रागडे, अर्जुन कुंभलकर विपिन टेभुर्णे,एजाज शेख,जाबु शेख,निवृत्ती गभणे,मयुर खोब्रागडे, बालक गजभिये,राजु फुलबांधे,पुरुपोत्तम गडकर महेश श्रुंगारपवार व परिसरातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 ● लोकप्रतिनिधीची उदासिनता ● 

या क्षेत्रात एक नाही डझनभर राजकारणे आहेत. गेल्या २९ वर्षापासून अड्याळ तालुक्याची मागणी शासन दरबारी धूळखात पडली आहे.मात्र क्षेत्रातील एकाही राजकारण्यानी तालुका निर्मितीचा झेंडा धरला नाही. निवडणूकिच्या तोंडावर मात्र विकासाचे फुगे फोळणारे गल्ली बोळात तालुका निर्मितीचे तुनतुने वाजवित असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
●संघर्ष समिती दाखविणार काळे झेंडे●

  जिल्ह्यात अड्याळ तालुक्याचा प्रकरण तापले असुन ग्रामस्थानी निवडणुकिवर बंदी चा निर्णय घेतला आहे.संघर्ष समितीने शासनाला दिलेल्या अल्टीमेटम अद्यापही सुस्त प्रशासनाने पुर्ण न केल्याने संतप्त नागरीक राजकारण्याच्या सभा स्थळी जावून तालुक्याची साकळे घालीत आहेत.ग्रामस्थांनी निवडणूकीवर बहिष्कार व नेत्याला गावात प्रवेश बंदी घातले आहे.मात्र प्रकरण तापत असतांनाच अड्याळ येथे तालुका कृषि प्रदर्शनीत राजकीय पुढारी व जिल्हाधिकारी येणार आहेत त्यांना तालुक्याचे जाब विचारुन नंतरच गावात प्रवेश अन्यता समितीच्या वतीने काळे झेंडे दाखवून कार्यक्रमासमोर धरणे देण्यात येणार असल्याचे समितीने कळविले आहे. तरी अड्याळ परिसरातील जनतेनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.



Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours