मुंबई, 13 फेब्रुवारी : महाआघाडीमध्ये मनसेच्या सहभागावरून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी सकारात्मक वक्तव्य केलं होतं. त्यानंतर आज अजित पवार यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. दादर इथं मनसेच्या कार्यकर्त्याच्या घरी राज ठाकरे यांची भेट झाली आहे. या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. 
दोनच दिवसांपूर्वीच अजित पवार यांनी 'मताचं विभाजन टाळण्यासाठी मनसेनं आमच्यासोबत यावं' असं विधान अजित पवारांनी केले होतं. राज ठाकरेंना सोबत येण्याचं आवाहन केल्यानं राजकीय पंडितांच्या भुवया उंचावल्या आहेत.
विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी 'राज ठाकरे हे आमच्यासोबत आता जरी दिसत असले तरी आगामी काळात आमच्यासोबत येतील असं दिसतं नाही' असं सांगितलं होतं.
आता खुद्द अजित पवारांची राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. दादरमध्ये एका कार्यकर्त्याच्या घरीही भेट झाली आहे. 
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours