नाशिक, 14 फेब्रुवारी :  'आरएसएस हा बेलगाम घोडा असून त्याला लगाम घालण्यासाठी प्रयत्न केले जात नाही,' असं म्हणत भारिपचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर थेट हल्ला केला आहे. मालेगावात बहुजन वंचित आघाडीच्या जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस व आरएसएसवर जोरदार टीका केली आहे.
'सत्तेत आम्हाला व तुम्हाला यायचं आहे. त्यासाठी बेलगाम घोड्याची लगाम हातात घेण्यासाठी धोरण ठरवा. आरएसएस हा बेलगाम घोडा असून त्याला लगाम घालण्यासाठी प्रयत्न केले जात नाही. काँग्रेस त्यासाठी तयार नाही.  काँग्रेसने आरएसएस बाबत धोरण मांडले तर आम्ही त्याला  पाठिंबा द्यायला तयार आहोत,' असं म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसलाही धारेवर धरलं आहे.
RSS हेच मुख्य टार्गेट
'देशात दोन सरकार चालत आहेत. एक संविधानाप्रमाणे तर दुसरं मोहन भागवत यांच्या सांगण्याप्रमाणे. जर दुसऱ्यांदा देशात त्यांचे सरकार आले तर समजा हिटलरचे सरकार येईल,' असंही आंबेडकर यांनी म्हटलं आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours