14 फेब्रुवारी : शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे कला दालनाच्या बांधकामात आडकाठी घालण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करत शिवसेना नगरसेवकांनी मीरा भाईंदर महापालिकेच्या महासभेत चांगलाच गोंधळ घातला. त्यानंतर भाजप-सेना नगरसेवकांत धक्काबुक्कीही झाली.
मीरा भाईंदर महापालिकेच्या महासभेत सत्ताधारी भाजपचे नगरसेवक प्रशांत दळवी यांनी बाळासाहेब ठाकरे व प्रमोद महाजन कला दालनाच्या विषयावर ठराव करत पुढील महासभेत आर्थिक तरतूद व अन्य माहिती सादर करण्यास सांगितले. त्यानंतर स्थायी समितीमध्ये सर्व मंजुऱ्या व निधी उपलब्ध असताना निविदा मुद्दाम मंजूर केली नसल्याचे सांगत शिवसेना नगरसेवक आक्रमक झाले.
शिवसेना नगरसेवकांनी भाजपविरोधात जोरदार घोषणाबाजी करत माईक खेचून तोडले. तर सेना नगरसेवकांना प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपा नगरसेवकांनीदेखील घोषणा दिल्या. भाजप आणि सेनेमधील हमरातुमरीवरून सुरू झालेला हा वाद थेट धक्काबुक्कीपर्यंत गेला. 
आक्रमक झालेल्या सेना नगरसेवकांच्या साथीला काँग्रेसचे नगरसेवक सुध्दा धावून गेले. त्यानंतर मग सेनेच्या नगरसेवकांनी सचिवांचा तसंच महापौरांचा माईक खेचला. एक माईक तर तोडून टाकला. आक्रमक झालेल्या सेना नगरसेवकांना प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपाचे नगरसेवक सुध्दा पुढे आल्याने दोघांमध्ये हमरीतुमरी व धक्काबुक्की झाली. 
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours